
फोटो सौजन्य: iStock
लग्नाचे सीजन सुरु झाले आहेत. अशातच कपड्याच्या खरेदीपासून ते मंगल कार्यालय कुठला बुक करायचा याचे सर्व निर्णय अनेक कुटुंबाने घेतलेच असतील. खरंतर लग्न हे फक्त दोन व्यक्तींना एकत्र आणत नाही तर दोन कुटुंबाना एकत्र आणते.
लग्न कुठल्याही व्यक्तीसाठी आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. हाच क्षण अनेकदा चित्रपटातून अधिक उत्तम पद्धतीने दाखवला जातो. पण अनेकदा याच चित्रपटातून लग्नाची पहिली रात्र काहीतरी वेगळ्या पद्धतीने दाखवली जाते. तुम्ही नक्कीच पहिले असेल की लग्नाच्या पहिल्या रात्री नवीन विवाहित जोडपं केशर किंवा हळदीचे दूध पित असतात. पण यामागे काही धार्मिक कारण आहे का की फक्त चित्रपटांमधून हे आपल्या समाजापर्यंत येऊन पोहोचले आहे. चला आज आपण लागणीच्या पहिल्या रात्रीला स्पेशल केशर किंवा हळदीचे दूध का पितात याबद्दल जाणून घेऊया.
हिंदू धर्मात लग्न हे अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र बंधन मानले जाते, जे करताना अनेक विधी आणि प्रथा पूर्ण होतात. लग्नाच्या पहिल्या रात्री केशर दूध पाजणे हा यापैकीच एक विधी आहे. ही जुनी परंपरा आहे, जी अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. असे मानले जाते की लग्नानंतरची पहिली रात्र ही पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनाचा एक महत्वाचा क्षण आहे. या विशेष प्रसंगी वैवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी केशर दूध प्यायले जाते. त्याच वेळी, काही लोक या प्रसंगी हळदीचे दूध देखील पितात, कारण हळद हे शुभ आणि पवित्रतेचे मानले जाते. अशा स्थितीत लग्नानंतर हळदीचे दूध प्यायल्यास वैवाहिक जीवनात सुख आणि पवित्रता येते.
काय आहे Friendship Marriage, जपानमध्ये वाढतोय ट्रेंड; नेहमीच्या लग्नापेक्षा काय आहे वेगळेपण?
आपल्या हिंदू परंपरेत अनेक प्रसंगी दूध आणि केशर वापरले जाते. कारण परंपरेनुसार, दूध हे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच लग्नाच्या पहिल्या रात्री दूध प्यायले जाते, जेणेकरून वैवाहिक जीवनाची शुभ आणि गोड सुरुवात व्हावी.
त्याचबरोबर या परंपरेमागे एक वैज्ञानिक कारणही आहे. वास्तविक, हळद आणि केशर शतकानुशतके कामोत्तेजक म्हणून वापरले जात आहे. ट्रायप्टोफॅनने समृद्ध दुधात केशर किंवा हळद टाकल्याने नवविवाहित जोडप्यांना तणावमुक्त होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, ते चिंता आणि नैराश्य दूर करण्यास देखील मदत करते. अशा स्थितीत लग्नाच्या पहिल्या रात्री दुधात केशर किंवा हळद टाकून प्यायल्याने नवविवाहित जोडप्यांमधील वातावरण प्रसन्न होते.
कामसूत्रात दूध पिण्याचा उल्लेख केला आहे. वास्तविक, असे मानले जाते की ते सेक्ससाठी ऊर्जा आणि उत्तम स्टॅमिना देते. अशा परिस्थितीत, लग्नाच्या पहिल्या रात्री जोडप्याचा अनुभव सुधारण्यासाठी त्यांना केशर किंवा हळद टाकून दूध दिले जाते.