फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे नेमके काय
लग्न म्हणजे दोन माणसे एकत्र बांधली जातात,ज्यात दोन जीवांचं बंधन तर असतंच आणि सुख-दुःखात एकमेकांना साथ दिली जाते. याशिवाय हे दोन कौटुंबिक सख्यही मानलं जातं. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये प्रेमसंबंध असणे महत्त्वाचे असते, तरच लग्न टिकते असे आजपर्यंत पिढ्यानपिढ्या सांगण्यात आले आहे.
परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जपानमध्ये लग्नाचा एक अनोखा प्रकार ट्रेंडमध्ये येत आहे. याला ‘Friendship Marriage’ म्हणतात. पारंपारिक लग्नापेक्षा हे अगदी वेगळे आहे. चला जाणून घेऊया काय आहे ‘फ्रेंडशिप मॅरेज’. हो तुम्ही योग्यच वाचलं आहे. पण नेमका लग्न आणि फ्रेंडशिप मॅरेजमधील फरक काय आहे याबाबत आता तुम्हाला जी उत्सुकता लागली आहे, ती आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStocK)
फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे काय?
फ्रेंडशिप मॅरेजमध्ये, दोन लोक कायदेशीररित्या विवाहित असतात, परंतु त्यांच्यात पारंपारिक विवाहासारखे प्रेमसंबंध नसतात. ते एकमेकांसोबत मित्रांसारखे राहतात आणि जीवनाच्या विविध पैलूंवर एकत्र निर्णय घेतात. या प्रकारच्या विवाहात जोडपे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य सांभाळतात आणि एकमेकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतात. जे आपल्या नेहमीच्या लग्नाप्रमाणे नसते. मैत्रीला यामध्ये जास्त प्राधान्य देण्यात येते.
1-1-1-1 मॅरेज रूल्सचा वाढतोय ट्रेंड, डेटपासून शारीरिक संबंधापर्यंत नातं होईल घट्ट
Friendship Marriage ट्रेंडिंगमध्ये असण्याची कारणे

ट्रेंडिंगमध्ये असणारे फ्रेंडशिप मॅरेज
Open Marriage म्हणजे काय? या लग्नातील 5 सर्वात मोठे धोके कोणते






