Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Hygiene: 5 कारणांमुळे शारीरिक संबंधांनंतर सुजते योनी, कशी घ्याल काळजी

Vagina Swelling Cause: जर तुमची योनीदेखील लैंगिक संबंधानंतर सूजत असेल, तर त्याच्या कारणांशी संबंधित माहिती घेऊन आलो आहोत आणि ते कसे टाळावे हेदेखील जाणून घेऊ.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 04, 2024 | 03:47 PM
व्हजायनल सूज येण्याची कारणे काय आहेत

व्हजायनल सूज येण्याची कारणे काय आहेत

Follow Us
Close
Follow Us:

अनेक स्त्रिया शारीरिक संबंधांनंतर योनिमार्गावर सूज आल्याची तक्रार करतात. विशेषतः योनीमार्गाच्या भोवतालची त्वचा सूजते. महिलांना सूज आल्याने खूप अस्वस्थ वाटते. सूज काही तासांतच निघून जाते, परंतु अनेक स्त्रियांमध्ये ती एक ते दोन दिवस टिकते. जरी, ही फार त्रासाची बाब नाही, परंतु स्त्रियांनी याबद्दल जागरूक असले पाहिजे. 

जर तुमची योनीदेखील लैंगिक संबंधांनंतर सूजत असेल,  तर त्यासाठी काय काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने हायजिनीक रहावे याबाबत आम्ही या लेखातून अधिक माहिती देत आहोत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

फ्रिक्शनमुळे त्रास 

जास्त घर्षणामुळे समागमानंतर योनीमध्ये सूज येऊ शकते. जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवल्याने योनिमार्गाच्या स्नायूंमध्ये घर्षण होते, परिणामी स्नायू फुगतात आणि अनेक महिलांना यामुळे योनी सुजण्याचा त्रास उद्भवतो. योनीला सूज येण्याच्या कारणांमध्ये हे सर्वात मुख्य कारण मानले जाते. विशेषतः पहिल्या वेळी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर हा त्रास अधिक होतो 

Vaginitis म्हणजे काय? असुरक्षित लैंगिक संबंध ठरू शकतात व्हजायनल इरिटेशनचे कारण, वाचा सविस्तर

ल्युब्रिकेशनची कमतरता 

समागमाच्या वेळी कोणतेही Lubricant न वापरल्याने घर्षण वाढते. विशेषत: जर तुमची योनी कोरडी असेल आणि तुमच्याकडे नैसर्गिक वंगण फारच कमी असेल आणि तुम्ही इतर कोणतेही वंगण वापरत नसाल, तर अशा स्थितीत लैंगिक क्रिया करताना योनीचे घर्षण खूप जास्त होते. त्याच वेळी, ते तुमच्या योनीच्या आसपासच्या त्वचेवर अधिक परिणाम करू शकते आणि योनीला जास्त सूज येते.

अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन 

जर तुम्हाला प्रत्येक वेळी लैंगिक संबंधांनंतर योनीमध्ये सूज येत असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेची अ‍ॅलर्जी तपासली पाहिजे. अनेक महिलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते आणि त्यांना सहज अ‍ॅलर्जी होते. विशेषत: लेटेक्स कंडोम, टॅम्पन्स, साबण, ल्युब्रिकंट्स इत्यादीमुळे सामान्यत: स्त्रियांच्या योनीमार्गात जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे योनीच्या सभोवतालचा भाग सुजतो. 

अनेक वेळा, कंडोम बनवताना वापरल्या जाणाऱ्या सामग्री आणि ल्युब्रिकंट्समुळे, योनीच्या आसपासच्या भागात अ‍ॅलर्जीची प्रतिक्रिया उमटते. त्यामुळे लालसरपणा, सूज, खाज सुटणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

यीस्ट इन्फेक्शन 

योनीमध्ये सूज येण्यासाठी यीस्ट इन्फेक्शन जबाबदार असू शकते. यीस्ट संसर्ग व्हजायनल ओपनिंग आणि अंतर्गत लैंगिक अवयवांवर परिणाम करतात. संभोग दरम्यानदेखील चिडचिड निर्माण होऊ शकते आणि आत पसरण्यास सुरवात करतात, ज्यामुळे योनीमध्ये सूज येते. अशा स्थितीत आवश्यक औषधे घेतल्याने काही वेळात संसर्ग कमी होतो आणि सूजही कमी होऊ लागते.

‘पैसे दो, बॉयफ्रेंड लो’, Rental Boyfriend चा ट्रेंड; कुठे मिळतात भाड्याने बॉयफ्रेंड, एका क्षणात करतात Impress

गरोदरपणातील शारीरिक संबंध 

गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्हाला योनिमार्गात सूज येऊ शकते. जसजसे बाळ वाढते तसतसे त्याचा दाब व्हजायनल वॉलवर आणि त्याच्या सभोवतालच्या रक्तवाहिन्यांवर पडतो. याचा अर्थ असा नाही की गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंध पूर्णपणे टाळले पाहिजेत, परंतु याची वेळ जास्त ठेऊ नका. याशिवाय, लैंगिक क्रिया करताना भरपूर ल्युब्रिकंट्स वापरा, ज्यामुळे घर्षण कमी होण्यास मदत होते.

योनी सूज कशी टाळाल

  • कंडोम आणि ल्युब्रिकंटच्या अ‍ॅलर्जीकडे लक्ष द्या आणि ब्रँड बदला. तसेच, समस्या कमी होत नसल्यास, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • नॉन-लेटेक्स कंडोम वापरा
  • जर तुम्हाला यीस्ट इन्फेक्शन किंवा STI असेल तर त्या दिवसांसाठी सारीरिक संबंध करू नका आणि औषधे घ्या
  • सूज आल्यास, प्रभावित भागावर कोल्ड कॉम्प्रेस लावा
  • संभोगानंतर योनीमार्ग कोमट पाण्याने स्वच्छ करा
  • शारीरिक संबंधादरम्यान घर्षण कमी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात ल्युब्रिकंटचा वापर करावा 

Web Title: Why vagina swells after physical intercourse how to avoid swelling 5 reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 03:47 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
1

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक
2

PeptideTrend : दीर्घायुष्याचे गुपित की फसवणूक? व्हायरल होणाऱ्या पेप्टाइड इंजेक्शनचे सत्य उघड; रिपोर्ट धक्कादायक

World Pneumonia Day : लहान मुलांची योग्य काळजी घ्या… ! ४२ महिन्यांत ‘निमोनिया’चे ३२ बळी
3

World Pneumonia Day : लहान मुलांची योग्य काळजी घ्या… ! ४२ महिन्यांत ‘निमोनिया’चे ३२ बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.