Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

इन्फ्लुएन्झासाठी Trivalent or Quadrivalent या दोन्ही लसी महत्वाच्या मानल्या जातात. नक्की यातील फरक काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीने वापर करावा याबाबत आपण या लेखातून माहिती घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 17, 2026 | 02:03 PM
कोणती लस इन्फ्लुएन्झासाठी महत्त्वाची (फोटो सौजन्य - iStock)

कोणती लस इन्फ्लुएन्झासाठी महत्त्वाची (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • ट्रायव्हॅलेंट की क्वाड्रायव्हॅलेंट नक्की कोणती लस फ्लू साठी योग्य 
  • इन्फ्लुएन्झासाठी कोणती लस वापरावी 
  • कोणत्या लसीचा वापर करणे योग्य आहे तज्ज्ञांचे मत 
इन्फ्लुएन्झा (फ्लू) विषाणूपासून संरक्षणासाठी फ्लू लस महत्त्वाची मानली जाते. मात्र अनेकांना प्रश्न पडतो, ट्रायव्हॅलेंट लस घ्यावी की क्वाड्रायव्हॅलेंट? या दोन लसींमध्ये नेमका फरक काय आहे आणि बदल का करण्यात आला आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य माहिती असणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र अंतिम निर्णय नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा, असेही ते स्पष्ट करतात. डॉ. अनिश पिल्लई, वरिष्ठ, नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ , मदरहुड हॉस्पिटल्स, खारघर,नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती आहे. 

फ्लू लसीकरण का महत्त्वाचे?

इन्फ्लुएन्झा म्हणजेच फ्लू हा दरवर्षी पसरणारा विषाणूजन्य आजार असून, काही वेळा तो न्यूमोनिया तसेच गंभीर श्वसन संसर्गाचे कारण ठरू शकतो. लहान मुलं, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांना फ्लूचा धोका अधिक असतो. वेळीच फ्लूची लस घेतल्यास आजाराची तीव्रता आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका आणि गुंतागुंत कमी करता येते.

देशात इन्फ्लुएन्झा H3N2 चा वाढता धोका, व्हायरसमुळे आत्तापर्यंत 9 जणांना मृत्यू, 2 जण महाराष्ट्रातील; आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार महत्त्वाची बैठक

क्वाड्रायव्हॅलेंट फ्लू लस म्हणजे काय?

क्वाड्रायव्हॅलेंट फ्लू लस चार प्रकारच्या फ्लू विषाणूंविरुद्ध संरक्षण देते. यामध्ये –

  • इन्फ्लुएन्झा ए – H1N1 
  • इन्फ्लुएन्झा ए – H3N2
  • इन्फ्लुएन्झा बी – व्हिक्टोरिया प्रकार
  • इन्फ्लुएन्झा बी – यामागाटा प्रकार यांचा समावेश असतो.
ट्रायव्हॅलेंट फ्लू लस म्हणजे काय?

ट्रायव्हॅलेंट फ्लू लस तीन प्रकारच्या फ्लू विषाणूंविरुद्ध संरक्षण देते. यामध्ये –

  • इन्फ्लुएन्झा ए – H1N1
  • इन्फ्लुएन्झा ए – H3N2
  • इन्फ्लुएन्झा बी – व्हिक्टोरिया प्रकार यांचा समावेश असतो.
इन्फ्लुएन्झा ए प्रकार बहुतेक फ्लू साथींसाठी आणि गंभीर रुग्णसंख्येतील वाढीस कारणीभूत ठरतो, तर इन्फ्लुएंझा बी प्रकार विशेषतः मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढवतो. त्यामुळे दरवर्षी जागतिक पातळीवरील सर्वेक्षणानुसार लसीतील विषाणूंचे प्रकार ठरवले जातात.

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत : आरोग्यमंत्री तानाजी सावंत

नेमका काय झालाय बदल?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2025–26 च्या फ्लू हंगामासाठी पुन्हा ट्रायव्हॅलेंट फ्लू लसीची शिफारस केली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे इन्फ्लुएन्झा बी मधील ‘यामागाटा’ प्रकार 2020 नंतर जगात कुठेही आढळलेला नाही. त्यामुळे त्या प्रकाराविरुद्ध लस देण्याची गरज सध्या उरलेली नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, दोन्ही लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. काही देशांमध्ये अद्याप क्वाड्रायव्हॅलेंट लस वापरात आहे, कारण तेथे साठा आणि नियामक परवानग्या उपलब्ध आहेत. मात्र कोणती लस घ्यावी, याचा निर्णय डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती पाहून घ्यावा.

ट्रायव्हॅलेंट आणि क्वाड्रायव्हॅलेंट दोन्ही फ्लू लसी या फ्लूपासून संरक्षण देण्यासाठी उपयुक्त आहेत. क्वाड्रायव्हॅलेंट लस व्यापक प्रमाणात संरक्षण देते, तर ट्रायव्हॅलेंट लस ही कमी खर्चात अधिक उत्पादनक्षम ठरते. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासाच्या आधारे लसीतील विषाणूंची निवड करते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच फ्लू लसीकरण करणे हे मुलं आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

Web Title: What is the difference between trivalent or quadrivalent know the importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips
  • vaccination in India

संबंधित बातम्या

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
1

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
2

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Heart Disease: Intermittent Fasting मुळे वाढू शकतात हृदयाचे आजार? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा
3

Heart Disease: Intermittent Fasting मुळे वाढू शकतात हृदयाचे आजार? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
4

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.