
मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात?
देशासह राज्यभरात सगळीकडे मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. प्रत्येक ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या चालीरीतींप्रमाणे सण साजरा केले जातात. मकरसंक्रांत हा दरवर्षी 14 आणि 15 जानेवारीला साजरा केला जातो. नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी महिला काळ्या रंगाची साडी परिधान करतात. तसेच या दिवशी प्रत्येक घरात जाऊन तीळ गूळ वाटले जातात. तर अनेक घरांमध्ये हळदीकुंकू ठेवले जाते. मकरसंक्रांती सणानिमित्त बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाच्या आणि डिझाईन्सच्या पतंगी विकण्यासाठी आल्या आहेत. संक्रांतीच्या दिवशी प्रामुख्याने काळे कपडे परिधान केले जातात. मात्र हा रंग अनेक लोक अशुभ मानतात. पण संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगला विशेष महत्व आहे. चला तर जाणून घेऊया काळा रंग शुभ आहे की अशुभ? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – pinterest)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
देशभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात मकरसंक्रांती सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक महिला काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे . संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे प्रामुख्याने परिधान केले जातात. कारण राज्यभरात सगळीकडे हिवाळा ऋतू सुरु आहे. थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. याशिवाय काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये जास्त उष्णता तयार होते, जी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. म्हणून मकर संक्रांतीला तीळ गूळ दिले जातात.
हिंदू धर्मानुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर दिवस मोठा आणि रात्री छोटी होते. तसेच मकरसंक्रांत झाल्यानंतर हळूहळू थंडीचाओघ सुद्धा कमी होऊ लागतो. मकर संक्रांत म्हणजे नवीन पिकाच्या आगमनाचा काळ आहे, असे मानले जाते. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक ठिकाणी काळ्या रंगाचे कपडेपरिधान केले जातात. काळा रंग अशुभ मानला जातो. पण मंळसूत्रामध्ये वापरले जाणारे मणी हे काळेच असतात. संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. काळोख्या रात्रीला या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र घालून निरोप दिला जातो. याशिवाय काळे कपडे उष्णता शोषून घेतात. शरीर उबदार राहावे, म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.