Winter Health: थंडीत सकाळी अंथरुणातून उठण्याची इच्छा होत नाही? Winter Blues ची 'ही' लक्षणे दुर्लक्षित करू नका

What is Winter blues and Symptoms: हिवाळ्यात जास्त झोप येणे किंवा सकाळी उठण्याची इच्छा न होणे. तसेच, दिवसभर थकवा आणि आळस जाणवणे यामागची कारणे कोणती, जाणून घ्या.
photo- Ai generated
What is Winter blues and SymptomsWhat is Winter blues and Symptoms
Published on: 
Updated on: 
  • Winter Blues म्हणजे काय?

  • Winter Blues चा मानसिक आरोग्यावर परिणाम

  • जाणून घ्या लक्षणे

Winter blues: हिवाळा सुरु होताच, अनेक लोकांना जास्त झोप येऊ लागते. त्यांना सकाळी अंथरुणातून उठण्याची इच्छा होत नाही. याशिवाय त्यांना दिवसभर सुस्त वाटते किंवा काहीही करण्याची इच्छा होत नाही. परंतु, लोक अनेकदा याकडे थंडी किंवा केवळ सामान्य सुस्ती म्हणून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे का की हिवाळ्यातील हा बदल 'विंटर ब्लूज' (winter blues) देखील असू शकतो.

हिवाळ्यातील लहान दिवस आणि मोठी रात्र शरीराच्या जैविक घड्याळावर परिणाम करू शकतात. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे मनःस्थिती आणि झोपेचे नियमन करणाऱ्या हार्मोन्सवरही परिणाम होतो. काहींसाठी, ही समस्या केवळ सामान्य सुस्तीपुरती मर्यादित असते. तर इतरांमध्ये याचे 'सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर' (SAD) मध्ये रुपांतर होऊ शकते. हिवाळ्यात आपल्याला जास्त झोप आणि सुस्ती का येते यामागचे कारण काय, जाणून घेऊयात.

विंटर ब्लूज म्हणजे काय?

विंटर ब्लूज ही एक अशी अवस्था आहे, ज्यात हिवाळ्यात व्यक्तीची मनःस्थिती बिघडते. त्यांना उदास, थकलेले, एकटे आणि सुस्त वाटू शकते.या काळात, व्यक्तीला भरपूर झोपायला आवडते. तसेच, मित्र आणि कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा होत नाही. याशिवाय, दैनंदिन जीवनातील काम करायला आवडत नाही. काहींना क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड होऊ शकते. तसेच, गोड पदार्थ आणि इतर गोष्टी खाण्याची इच्छा होऊ शकते.

photo- Ai generated
Winter Health Tips: हिवाळ्यात तहान कमी लागते म्हणून पाणी कमी पिताय? डिहायड्रेशन टाळण्यासाठी आहारात समावेश करा 'या' गोष्टी

विंटर ब्लूजची मुख्य लक्षणे कोणती?

  • सकाळी उठायला त्रास होतो.

  • नेहमीपेक्षा जास्त झोपणे.

  • दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.

  • कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू न शकणे.

  • एकटे राहण्याची इच्छा होणे.

  • पुन्हा पुन्हा भूक लागणे.

  • सतत गोड खाण्याची इच्छा होणे आणि वजन वाढणे.

  • चिडचिड आणि अस्वस्थता.

  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.

हिवाळ्यात आळस आणि जास्त झोप येण्याची प्रमुख कारणे

सूर्यप्रकाशाचा अभाव

हिवाळ्यात दिवस लहान असतात. तसेच सूर्यप्रकाशही कमी मिळतो. याचा शरीराच्या जैविक घड्याळावर, म्हणजेच त्याच्या नैसर्गिक झोप-जागण्याच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. यामुळे सकाळी उठायला त्रास होऊ शकतो आणि दिवसभर सुस्ती जाणवू शकते.

मेलाटोनिन हार्मोनचा परिणाम

मेलाटोनिनला हे झोपेचे हार्मोन म्हटले जाते. अंधार झाल्यावर शरीरात मेलाटोनिनचे उत्पादन वाढते. हिवाळ्यातील दीर्घकाळच्या अंधारामुळे काही लोकांच्या झोप-जागण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो आणि त्यांना जास्त झोप येऊ शकते.

सेरोटोनिनच्या पातळीवर परिणाम

सेरोटोनिन हे मेंदूतील एक रसायन आहे जे मनःस्थिती नियंत्रित करण्यात भूमिका बजावते. कमी प्रकाशामुळे त्याच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. यामुळे, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो.

आहारातील बदल

हिवाळ्यात, अनेक लोकांना गोड, तळलेले आणि हाय-कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होते. असंतुलित आहारामुळे ऊर्जेवर आणि दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होऊ शकतो.

photo- Ai generated
Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!