हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स
हिवाळा जसजसा जवळ येतो तसतसे लोक त्वचेच्या विविध समस्यांबद्दल तक्रार करताना दिसतात. हिवाळ्यात आढळून येणाऱ्या त्वचेच्या समस्यांपैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे हात आणि पायांना भेगा पडणे. हे प्रामुख्याने हवेत दमटपणा नसल्यामुळे उद्भवते. हिवाळ्यात अतिशय गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जाते ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसते. विशेषत: तुमच्या पायांना भेगा पडलेली त्वचा पहायला मिळते आणि यावर उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते. यामुळे गंभीर संसर्ग होण्याचा धोका देखील वाढू शकतो. म्हणूनच हिवाळ्यात हात किंवा पायांना भेगा पडण्याचा धोका टाळण्यासाठी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.
हिवाळा ऋतू आला की, तुमच्या पायांच्या आणि हातांच्या त्वचेला भेगा पडू लागतात. भेगा पडलेल्या त्वचेसह दैनंदिन कामे करणे वेदनादायक आणि अस्वस्थ निर्माण करु शकते. या हिवाळ्यात तुमची निरोगी राहण्याकरिता खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. डॉ. शरीफा चौसे, त्वचारोग तज्ज्ञ, डॉ शरीफा स्किन केअर क्लिनिक, मुंबई यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, ज्या हिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्यास तुम्हाला मदत करतील.
त्वचा पूर्णपणे मॉइश्चरायझ करा
त्वचा मॉईस्चराईज करणे अत्यंत आवश्यक
हिवाळ्यात त्वचेवर, विशेषतः हात आणि पायांवर मॉइश्चरायझर लावण्याचा सल्ला दिला जातो. शिया बटर, ग्लिसरीन किंवा पेट्रोलियम जेली यासारख्या घटकांचा समावेश असलेल्या हायड्रेटिंग मॉइश्चरायझरची निवड करा. हे तुमच्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास तसेच त्वचा रुक्ष व निस्तेज होण्यापासून रोखते.
अंघोळ केल्यानंतर किती वेळा फॉलो करावे स्किन केअर रुटीन? त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स
सौम्य साबण वापरा
सौम्य साबण वा बाथ वॉशचा करा वापर
तुम्ही वापरत असलेला साबण हा तुमच्या त्वचेतून नैसर्गिक तेल काढून टाकतो. ज्यामुळे ते खडबडीत होते व त्यांचे निर्जलीकरण होऊ शकते. हे टाळण्यासाठी सौम्य घटकांचा समावेश असलेला साबण वापरा अथवा तुम्ही साबण न वापरता बॉडी वॉश वापरणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये अधिक केमिकल्सचा वापर करण्यता येत नाही आणि त्वचाही चांगली राखण्यास मदत करते
मोजे घालून पाय व हातांचे संरक्षण करा
जास्तीत जास्त वेळ मोजे वापरा
तुम्ही बाहेर जाताना पायात मोजे किंवा हातमोजे घालण्याचा प्रयत्न करा. बाहेरील थंड हवा तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकते आणि त्वचेच्या विविध समस्यांचा धोका वाढवू शकते. आपण पायात सॉक्स किंवा हातमोजे घालत आहात याची खात्री करा जे मऊ आणि श्वास घेण्यायोग्य कापडापासून बनले आहे. हे तुमच्या पाय आणि हातांमध्ये भेगा पडण्याचा धोका टाळतात.
प्रत्येक मुलीकडे असायलाच हवेत 5 Skin Care, त्वचा राहील कायम तरूण
त्वचा हायड्रेटेड राखा
दिवसरात्र त्वचा हायड्रेट ठेवण्याची काळजी घ्या
तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट राखण्यासाठी मॉइश्चरायझर वापरत असताना त्वचा हायड्रेट राखणे गरजेचे आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. हिवाळ्यात तुम्हाला तहान लागत नाही परंतु तुमच्या शरीरातील हायड्रेशन पातळी राखणे अत्यावश्यक आहे. यामुळे तुमची त्वचा मऊ होण्यास मदत होऊ शकते.
हिवाळ्यात सर्वाधिक भेगा या पायांना पडतात, त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी. नियमित थंडी संपेपर्यंत आणि अगदी नंतरही आपली त्वचा मॉईस्चराईज्ड आहे की नाही याकडे अधिक लक्ष द्या. यामुळे त्वचा सुंदर, ताजीतवानी राहते आणि तुम्हाला त्रासही होत नाही.