Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Special Recipe: हिवाळ्यात घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट पंजाबी स्टाईल ‘आलू पराठे’

Aloo Paratha Recipe : हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात गरमा गरम बटाट्याचा पराठा खाण्याची मजा काही औरच! पंजाबी स्टाईल खमंग आणि चविष्ट पराठा घरी कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 30, 2025 | 09:39 AM
Winter Special Recipe: हिवाळ्यात घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट पंजाबी स्टाईल 'आलू पराठे'

Winter Special Recipe: हिवाळ्यात घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट पंजाबी स्टाईल 'आलू पराठे'

Follow Us
Follow Us:
  • बटाट्याचा पराठा फक्त चावीलाच चांगला लागत नाही आणि तो आरोग्यासाठी फायद्याचाही ठरतो.
  • गरम तव्यावर तुपात खमंग भाजलेला पराठा आणि त्यासोबत चटकदार लोणच्याची साथ नाश्त्याला रंगतदार बनवते.
  • पंजाबचा हा पारंपरिक पदार्थ घरी कसा बनवायचा याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
पंजाबी जेवण म्हटलं की पराठे, बटर आणि मसालेदार चवींची आठवण लगेच होते. त्यातही पंजाबी स्टाईल आलू पराठा हा पदार्थ तर प्रत्येकाच्या खास आवडीचा आहे. उत्तर भारतात, विशेषतः पंजाबमध्ये सकाळचा नाश्ता म्हणजे गरमागरम आलू पराठा, त्यावर साजूक तूप किंवा पांढरं लोणी आणि सोबत दही, लोणचं किंवा मक्खन. हा पराठा फक्त पोट भरतो असं नाही, तर मनालाही समाधान देतो.

१० मिनिटांमध्ये वाटीभर चणाडाळीपासून बनवा स्वादिष्ट हलवा, पुरणपोळीपेक्षा लागेल सुंदर पदार्थ

पंजाबी आलू पराठ्याची खासियत म्हणजे त्यातील भरपूर मसाले, उकडलेल्या बटाट्यांचं मऊ मिश्रण आणि जाडसर, मऊ पण थोडा खमंग पराठा. हा पराठा साध्या जेवणालाही खास बनवतो. घरातल्या सगळ्यांसाठी बनवायला सोपा, पौष्टिक आणि पोटभरीचा असा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. रविवारचा ब्रेकफास्ट, पाहुण्यांसाठी खास मेनू किंवा डब्यासाठी परफेक्ट असा पंजाबी आलू पराठा एकदा नक्की करून पाहा. जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.

साहित्य:

कणकेसाठी:

  • गव्हाचं पीठ – 2 कप
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – मळण्यासाठी
स्टॅफिंगसाठी:
  • उकडलेले बटाटे – 4 (मध्यम आकाराचे)
  • हिरवी मिरची – 1–2 (बारीक चिरलेली)
  • आलं – 1 टीस्पून (किसलेलं)
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
इडली डोसासोबत खाण्यासाठी झटपट घरी बनवा उडपी हॉटेल स्टाईल खोबऱ्याची चटणी, नोट करून घ्या अस्सल साऊथ इंडियन पदार्थ

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचं पीठ, मीठ घालून पाणी वापरून मऊ कणिक मळा. कणिक झाकून 15–20 मिनिटे ठेवून द्या.
  • उकडलेले बटाटे सोलून नीट कुस्करा. त्यात हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि सगळे मसाले घालून मिश्रण एकजीव करा.
  • कणकेचे मध्यम आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळा थोडा लाटून मध्ये आलूचं मिश्रण भरा.
  • कडा बंद करून पुन्हा हलक्या हाताने गोल पराठा लाटा.
  • गरम तव्यावर पराठा भाजा. दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
  • गरमागरम पंजाबी स्टाईल आलू पराठे तयार आहेत.
  • हे पराठे दही, लोणचं, पांढरं लोणी किंवा बटरसोबत सर्व्ह करा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणातही हा पराठा अप्रतिम लागतो.

Web Title: Winter special punjabi style aloo paratha recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • marathi recipe
  • potato recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.