मित्र मैत्रिणींना पाठवा 'हे' खास संदेश
मैत्रीला अनेक नावे दिली जातात. जगात मैत्रीचे नाते खूप खास आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फ्रेंडशिप डे केला जातो. यादिवशी मित्र मैत्रिणींना खास शुभेच्छा दिल्या जातात. शाळा, कॉलेज इत्यादी अनेक ठिकाणी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये नेहमी सोबत असतात ते म्हणजे मित्र मैत्रिणी. प्रत्येक सुख दुःखात मदतीला धावून येणाऱ्या मित्रांचे करावे तेवढे कौतुक कमीच असते. योग्य ते मार्गदर्शन करून दुःखाच्या क्षणी साथ देणारे हे मित्रच असतात. पण कामानिमित्त अनेकदा जवळच्या मित्रांची भेट होत नाही. त्यामुळे डिजिटल युगात तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना मेसेज पाठवून फ्रेंडशिप डे चा संदेश देऊ शकता. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला फ्रेंडशिप डे ला मित्र मैत्रिणींना पाठ्वण्यासाठी काही खास संदेश सांगणार आहोत, हे तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करून त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करू शकता.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Friendship Day 2024 : फ्रेंडशिप डे च्या दिवशी मित्र मैत्रिणींच्या हातावर बांधा ‘हे’ खास ट्रेंडी बँड्स
हे देखील वाचा: Friendship Day 2024: मैत्रीचा दिवस करा खास आणि आपल्या मित्रांसोबत ‘या’ निसर्गमय ठिकाणांना जरूर भेट द्या