फ्रेंडशिप डे ला मित्र मैत्रिणीच्या हातावर बांधा 'हे' खास बँड्स
जगभरात सगळीकडे 4 ऑगस्ट ला फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. मैत्रीच्या नात्यामधील प्रेम आणखीन वाढवण्यासाठी सगळीकडे फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आयुष्यात अनेक मित्र मैत्रिणी असतात. त्यातील काही मित्र मैत्रिणी हे आपल्या हृदयाच्या सगळ्यात जवळ असतात. आपल्या सुख दुःखात इतर आनंदाच्या क्षणी आपल्यासोबत कायम असतात. अनेकदा धावपळीच्या जीवनात मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे यंदाच्या फ्रेंडशिप डे ला मित्र मैत्रिणींना भेटून त्यांच्या सोबत हा खास दिवस नक्की साजरा करा. शाळा कॉलेज इतर सर्वच ठिकाणी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. शाळा कॉलेजमधील जवळच्या मित्रांना फ्रेंडशिप बँड्स बांधले जातात. हल्ली बाजारात अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रेंडशिप बँड्स उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही खास फ्रेंडशिप बँड्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना देऊ शकता.(फोटो सौजन्य-istock)
बाजारात अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रेंडशिप बँड्स उपलब्ध आहेत. त्यातील सगळ्यांचे आवडते फुलांचे फ्रेंडशिप बँड्स. हाताने तयार केलेले फुलांचे फ्रेंडशिप बँड्स हातावर अधिक उठावदार आणि सुंदर दिसतात. तसेचफुलांपासून तयार केलेले फ्रेंडशिप बँड्स तुम्ही हाताने तयार करू शकता.तुमच्या आवडत्या मित्र मैत्रिणीला कोणत्या रंगाचे फुल आवडते याचा विचार करू सुद्धा फ्रेंडशिप बँड्स बनवता येईल.
हे देखील वाचा: Friendship Day 2024: मैत्रीचा दिवस करा खास आणि आपल्या मित्रांसोबत ‘या’ निसर्गमय ठिकाणांना जरूर भेट द्या
फ्रेंडशिप डे ला मित्र मैत्रिणीच्या हातावर बांधा ‘हे’ खास बँड्स
मॅग्नेट फ्रेंडशिप बँड्सचा सगळीकडे मोठा ट्रेंड सुरु आहे. ट्रेंडिंगमध्ये असलेल्या सर्वच वस्तू सगळ्यांना आवडतात. हे मॅग्नेट फ्रेंडशिप बँड्स तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला देऊ शकतात. दोघांच्या हातातील सेम सेम बँड्स त्यांच्यातील घट्ट मैत्री दर्शवतील.
फ्रेंडशिप डे ला मित्र मैत्रिणीच्या हातावर बांधा ‘हे’ खास बँड्स
बाजारामध्ये नावांचे फ्रेंडशिप बँड्स बनवून मिळतात. त्यातील तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव सांगून तुम्ही ते तयार करून घेऊ शकता. सध्या सगळीकडे नावांचे बँड्स मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंगला आहेत.
हे देखील वाचा: Friendship Day 2024: विकतचे नाही तर तुमच्या जिवाभावाच्या मित्राला तुम्ही स्वतः बनवलेले गिफ्ट्स भेट करा!
कड्यांचे बँड्स तुमची पर्सनालिटीला शोभतील असे आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले हे कड्यांचे बँड्स तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की आवडतील.मागील अनेक वर्षांपासून बाजारात लेसचे बॅंड्स तुम्ही पहिले असतील. पण बदलत्या काळानुसार अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे.