फ़्रेंडशिप डे अवघ्या एका दिवसावर येऊन ठाकला आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीचाही फ़्रेंडशिप डे 4 ऑगस्ट रोजी म्हणजेच पहिल्या रविवारी जगभर साजरा केला जाणार आहे. हा दिवस मैत्रीच्या नात्याला आणि आपल्या जीवाभावाच्या मित्रांना समर्पित केला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या मित्रांना मैत्री दिवसाच्या शुभेच देतात किंवा काही भेटवस्तू गिफ्ट करतात. लहानपणचे मित्र आपण कितीही मोठे झालो तरी विसरता येत नाहीत. शाळा सुटते, कॉलेज सुटत मात्र मैत्रीची साथ आणि आठवणी नेहमीच आपल्या मनात घर करून राहतात. अशात आम्ही तुम्हाला सांगतो, हा मैत्री दिवस थोडा खास करा आणि या विकेंडला आपल्या मित्रांना घेऊन कुठे तरी फिरायला जा.
आपल्या कामाच्या वातावरणातून थोडा मोकळा वेळ काढत तुम्ही तुमच्या मित्रांसोबत छान वेळ घालवू शकता. जुने मित्र ज्यांच्याशी आता तुम्ही आता जात भेटणे होत नाही अशा मित्रांच्या खास भेटीचा संगम या मैत्री दिनानिमित्त घडवून आणा. हा दिवस वर्षातून एकदाच येतो त्यामुळे याला वाया घालवू नका आणि याचा पुरेपूर वापर करून घ्या. आज आम्ही तुम्हाला या मैत्रीदिनानिमित्त तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कोणकोणत्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता याची एक लिस्ट आणली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यातील एका ठिकाणाला भेट देऊ शकता.
हेदेखील वाचा – Friendship Day 2024: विकतचे नाही तर तुमच्या जिवाभावाच्या मित्राला तुम्ही स्वतः बनवलेले गिफ्ट्स भेट करा!
गोवा हे ठिकाण फिरण्यासाठीचे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण आहे. जगभरातून हजारो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी येऊन आपल्या ट्रिपचा आनंद लूटत असतात. तरुणांसाठीचे हे एक फेमस स्पॉट आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही तुमचा चांगला वेळ घालवू शकता. इथे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना गोव्यातील हिरवाई, पाण्याचे खेळ, धबधबे यांचा आनंद लुटता येईल.
भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे कुर्ग हेदेखील फिरण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण आहे. इथे तुम्ही निसर्गसौंदर्याचा अद्भुत आनंद अनुभवू शकता. तसेच इथे चहा, कॉफी आणि घनदाट जंगलांचा मनसोक्त आनंद लुटता येतो. एबी फॉल्स, मंडलपट्टी व्ह्यूपॉईंट, ब्रह्मगिरी शिखर, नामद्रोलिंग मठ आणि तांड्याडमोल शिखर यांसारखी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत.
जर तुम्हाला पर्वतांना भेट द्यायची असेल तर राजस्थानमधील उदयपूर तुमच्यासाठी एक उत्तम स्पॉट आहे. राजस्थानचे हे एक लहान शहर आहे, मात्र संपूर्णपणे सौंदर्याने नटलेले आहे. तलावांच्या या शहरात तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बोटिंगचा आनंद घेऊ शकता. इथे तुम्हाला अनेक ऐतिहासिक वाडेदेखील पाहायला मिळतील.
तुम्ही दिल्लीजवळ राहत असला तर तुम्ही विकेंडला नैनिताल किंवा मसुरीला भेट देण्याचा विचार करू शकता. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. इथे पर्वतांच्या शिखरावरून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.