
मंगळवार हा भगवान हनुमानजी तसेच मंगळ ग्रहाला समर्पित आहे. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे मंगळवारी मंदिरात किंवा घरी हनुमानजींच्या मूर्ती समोर आसनावर बसून मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा.
ज्योतिषशास्त्रात (Jyotish Shastrat) व्यक्तीच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक अध्यात्मिक उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होते. मंगळावार हा भगवान हनुमानजी (Lord Hanuman) यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत केल्याने कुंडलीतील मंगळ दोष (Mangal Dosh) दूर होतो. तसेच मंगळवारी व्रत (Mangalwar Vrat Vidhi) केल्याने व्यक्तीच्या मन-सन्मान, बल, साहस आणि पुरुषार्थमध्ये वृद्धी होते. चला तर मग जाणून घेऊया मंगळवारच्या व्रताविषयी अधिक माहिती.
असे करा व्रत
भगवान हनुमानजी यांना प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी ब्रह्म मुहूर्तला उठून स्नान करून स्वच्छ लाल कपडे घालावे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. हातात जल घेत व्रताचा संकल्प करावा. यानंतर हनुमानजींच्या समोर साजूक तुपाचा दिवा लावत फुलांचा हार किंवा फुलं अर्पण करावे. समोर चमेलीच्या तेलात भिजवलेला कापूस ठेवावा. दरम्यान, मंगळवार व्रताची कथा वाचावी. त्यानंतर हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पाठ करावा. शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा. व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसभरात फक्त एकच वेळा भोजन करावे. २१मंगळवारपर्यंत हे व्रत केल्याने विशेष लाभ होतो. या दिवशी सायंकाळी देखील हनुमानजींचे विधिवत पूजन करत आरती करावी. जर २१ व्रताचा संकल्प केला असेल तर २२ व्या मंगळवारी विधिवत पूजन करत उद्यापन करावे.
सायंकाळ देखील करा पूजा
मंगळवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर पूजा केल्याने भगवान हनुमान लवकर प्रसन्न होतात. मंगळवार मंगळ ग्रहाला देखील समर्पित आहे. या दिवशी हनुमानजीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे मंगळवारी मंदिरात किंवा घरी हनुमानजींच्या मूर्ती समोर आसनावर बसून मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा. यासोबत अगरबत्ती लावून पुष्प, शेंदूर, चमेलीचे तेल अर्पण करावे. असे केल्याने भगवान हनुमानजींच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात.