दातांवर साचलेला पिवळा थर मिनिटांमध्ये होईल गायब! स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ ठरतील प्रभावी
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरासोबतच त्वचा, केस आणि दातांवर लगेच दिसून येतो. सतत गोड, तिखट किंवा आंबट पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांवर पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. दात पिवळे झाल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. याशिवाय चारचौघांमध्ये हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटते. दात पिवळे होण्यामागे अनेक कारण आहेत. जंक फूडचे अतिसेवन, रंग असलेल्या पदार्थांचे सेवन, तंबाखू, गुटखा, चहा कॉफी, पानमसाला इत्यादी पदार्थांच्या अतिसेवनामुळे दातांवर प्लेक जमा होण्यास सुरुवात होते. दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते, मात्र कालांतराने हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात पिवळे पडणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांवर साचून राहिलेला पिवळा थर नष्ट करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
दात स्वच्छ करण्यासाठी लिंबू, संती किंवा केळीची साल वापरावी. यामध्ये नैसर्गिक क्लिन्झिंग गुणधर्म आढळून येतात. फळांच्या सालींचा वापर केल्यामुळे दातांवर वाढलेला पिवळेपणा हळूहळू कमी होण्यास मदत होते. याशिवाय दात अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतात. पण दातांवर फळांच्या साली घासताना जोरात घासू नये, यामुळे वेदना होऊन दातांमधून रक्त किंवा एनॅमल त्रास होण्याची शक्यता असते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फळांच्या साली दातांवर घासल्यास दात अतिशय चमकदार होतील.
सर्वच स्वयंपाक घरात तेल आणि मीठ उपलब्ध असते. या पदार्थांचा वापर केल्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी वाटीमध्ये मीठ आणि थोडस तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट दातांवर हलक्या हाताने घासा, यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावा.
शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी नियमित २ वेळा ब्रश करणे आवश्यक आहे. कारण जेवल्यानंतर दातांच्या फटींमध्ये अन्नपदार्थांचे कण तसेच साचून राहतात. हे कण हळूहळू कुजण्यास सुरुवात होते, ज्यामुळे दातांना कीड लागणे किंवा दातांमध्ये होल पडणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उदभवुन दातांचे नुकसान होते. त्यामुळे नियमित ब्रश केल्यास दातांमध्ये साचून राहिलेले अन्नकण, बॅक्टेरिया आणि थर निघून जाण्यास मदत होते.