
zomato delivery boy reveal his daily earning , zomato delivery man earning, lifestyle news, intresting, Zomato डिलिव्हरी बॉय एका दिवसांत किती कमाई करतो
सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. आता पेमेंट करण्यापासून ते बँकिंग कामामापर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाईन करता येतात. पूर्वी लोक अधिकतर घरगुती जेवणाला अधिक प्राधान्य द्यायचे मात्र आता जेवणदेखील बाहेरून ऑर्डर केले जाते. अनेकदा जेवण बनवायला कंटाळा आला की लोक घरबसल्या ऑनलाईन फूड ऑर्डर करतात. जेंव्हापासून पण जेव्हापासून ऑनलाइन फूड डिलिव्हरी ही संकल्पना भारतात आली आहे, तेव्हपासून लोकांचे बाहेरून जेवण ऑर्डर करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. याच्या मदतीने घरबसल्या खाद्यपदार्थ ऑर्डर केले जाते आणि ते घरपोचदेखील केले जाते.
या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर जेवणाची ऑर्डर केल्यानंतर काही वेळेतच तुमच्यापर्यंत जेवण पोहचवले जाते. तुमच्यापर्यंत जेवण पोहचवण्यासाठी लाखो डिलिव्हरी बॉईज काम करत असतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की, आपल्या आवडीचे अन्न आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या बदल्यात त्यांना किती पैसे मिळतात? अनेकांना वाटेल की डिलिव्हरी बॉय दररोज चांगली कमाई करत असेल. पण आज आम्ही तुम्हाला त्याची वास्तविकता सांगणार आहोत.
सोशल मीडियावर प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने सांगितले की त्याची रोजची कमाई नक्की किती आहे. डिलिव्हरी पार्टनर बनल्यानंतर, त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर जॉब जॉईन करून त्याने किती कमाई केली हे सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवसापासून त्याने आपली कमाई लोकांसोबत शेअर करायला सुरुवात केली. याचे नाव भानू प्रताप सिंह चौहान असे आहे. हा डिलिव्हरी बॉय कोटामध्ये फूड डिलिव्हरी करतो.
हेदेखील वाचा – Monsoon Hacks: अवघ्या 10 मिनिटांतच ओले कपडे सुकवण्याची ‘ही’ पद्धत वापरून पहा
भानू प्रताप सिंह याने सोशल मीडियावर आपल्या कमाईचे तपशील सर्वांसोबत शेअर केले. यावेळी त्याने सांगितले की, प्रत्येक ऑर्डरवर त्यांना किती पैसे मिळतील हे त्यांना आधीची सांगितले जाते. एकामागून एक ऑर्डर जर आल्या तर एका दिवसांत ते तीनशे रुपयांपर्यंतची कमाई करतात. मात्र अनेकदा असेही होते की ऑर्डर्स येत नाहीत अशावेळी कधीकधी फक्त साठ रुपयांच्या कमाईही समाधान मानावे लागते.