
Contract employees strike Maharashtra,
Ahilyanagar News: राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी
राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमांकात गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, उपाध्यक्ष. विलास निकम यांनी हा इशारा दिला आहे. राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देणेत आली आहेत. नागपूर येथे भेटणे साठी सोमवारी शिष्ट मंडळ जात आहे.
जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या दोन्ही योजना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने राबविल्या जात आहेत. ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, पाणीकर गोळा करणे, देखभाल दुरुस्ती, ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी बैठका घेणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी घनकचरा व मैला गाळ व्यवस्थापन तसेच गोबरधन आदी योजना राबविण्यात येतात. राज्य शासनाला या विभागाने अनेक प्रथम पुरस्कार मिळवून दिले. मात्र, शासनाने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून, तीन वर्षांपासून तीन महिन्यांचे एकत्रित वेतन दिले जाते, असा संघटनेचा आरोप आहे.
२० वर्षांपासून या विभागात कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यांना नोकरीत १० वर्षे झाले. त्यांना कायम करण्याबाबत औरंगाबाद मॅट कोर्टाचा निकाल लागला. त्यावरही शासन कोणतीही भूमिका घेत नाही, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ५) जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांना निवेदन सादर केले. यावेळी बंडू हिरवे, प्रकाश उमक, साजिद निजामी, मनोज डांगरे, कृष्णकांत खानझोडे, तृष्णांत शेंडे, प्रफुल्ल मत्ते, प्रवीण खंडारे, गीतेश गुप्ता, पायल फटिंग, प्रियंका रामटेके, नरेंद्र रामटेके, विशाल जुमळे आदी उपस्थित होते.