नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
हिंसक आंदोलनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष नेपाळकडे वळले आहे. नेपाळमधील काही सोशल मीडिया ॲप्स बंद झाल्याने तेथील Gen Z मंडळी चांगलेच चवताळले. तसेच मोठ्या संख्येत त्यांनी थेट संसदेत राडा घातला. यावेळी जीवितहानी सुद्धा झाली आहे. नेपाळमध्ये अचानक बिघडलेल्या परिस्थितीमुळे अनेक देशातील पर्यटक तेथे अडकले आहेत. महाराष्ट्रातील 150 पर्यटक देखील नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यांना येणारे कॉल आणि ऑनलाइन मेसेज अनुत्तरीत राहिल्याने त्यांच्या कुटुंबांची चिंता वाढत आहे. अखेर यावर राज्याचे मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
#WATCH | Mumbai | On unrest in Nepal, Maharashtra CM Devendra Fadnavis says, “This is an international issue. It is better if the Government of India speaks on it. Our tourists, including those from Maharashtra, who are visiting Nepal, are being brought back. We are in touch with… pic.twitter.com/AhhJtiv8Vh
— ANI (@ANI) September 11, 2025
मंजुरी असूनही रुग्णालयाचे स्वप्न धूसर! उपचारांना जवळपास अद्याप नाही इलाज, मोखाड्यात ग्रामस्थ नाराज
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. भारत सरकारने यावर बोलले तर बरे होईल. नेपाळला भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणले जात आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांशी संपर्क साधला आणि त्यांना लवकरात लवकर सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 150 पर्यटकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील 65, पुण्यातील 5, मुंबईतील 6, अकोला येथील 10, यवतमाळ येथील 1, लातूर येथील 2 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 1 पर्यटकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटकांच्या जिल्ह्यांची माहिती अद्याप उपलब्ध नाही. राज्यातील पर्यटक 6 टूर ऑपरेटरमार्फत नेपाळला गेले होते. नेपाळमधील हवाई आणि रस्ते वाहतूक बंद असल्याने सर्व पर्यटक हॉटेलमध्ये थांबले आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील 11 पर्यटक बसने उत्तर प्रदेशात सुखरूप पोहोचले आहेत.