सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या नियोजित सभा कोणाच्या तरी हट्टामुळे २ वेळा रद्द झाल्या. कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन सभेचे नियोजन केले होते. माझ्या सर्व कार्यकर्त्याना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून माफी मागतो, माजी आमदार राजन तेली यांचे व्हाटसअप स्टेटस जोरदार चर्चेत आहे. आज सकाळी आमदार राजन तेली यांनी आपल्या व्हाटसअपला हे स्टेटस ठेवत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. यामुळे भाजपात असलेली अंतर्गत धुसफूस बाहेर आली असून याची जोरदार चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या राजन तेली यांनी वॉट्सअप स्टेटस कुणाला उद्देशून ठेवला आहे? राजन तेली यांची नाराजी कोणावर आहे? त्यांनी जाहीरपणे कोणावर राग व्यक्त केला? याबद्दल सर्वत्र चर्चा रंगत आहेत.