चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व संशयित रितीक यादव हे दोघेही कामाला होते. कृष्णकुमार आणि रितीकमध्ये सिगारेटच्या लायटरवरून वाद झाला. कृष्णकुमार चिरखाण येथून पुढे जात असताना रितीकने त्याच्या डोक्यात वार करून…
सिंधुदुर्गमध्ये आज खासदार नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत विकास आढावा बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकासावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
केंद्र सरकारने नुकतेच वफ्फ विधेयक कायद्यात बदल केला आहे. यादरम्यान सिंधुदुर्गातील भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली आहे.
सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत अरबी समुद्रात नवे खनिज तेल साठे सापडले आहेत. त्यामुळे भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कवठी अन्नशांतवाडी येथे काजूच्या बागेतील चोरीवरून झालेल्या वादात संदीप करलकर यांची हत्या झाली. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
नागपूर येथे काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्या बद्दल काढलेल्या वक्तव्याबद्दल निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील नरेंद्रभक्त यांनी ओरोस तिठा ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
बेलापूर विधानसभेचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा आणि दुर्गम भागातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वितरण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
भाजप नेते व मंत्री नितेश राणे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी सिंधुदुर्गमध्ये भूमिका मांडली असून यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाबाबत देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
झाराप येथे पर्यटकाला चहाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीविरोधात कुडाळात सकल हिंदू समाजाने पोलिसांना निवेदन दिले. पर्यटनाला बाधा पोहोचू नये यासाठी संबंधित स्टॉल बंद करण्याची मागणी करण्यात आली.
०७.०५.२०२४ रोजी मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी या ठिकाणी व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्री करण्यासाठी आणून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली.
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी रस्ता उखडणारा ट्रेलर रोखला, नगरपंचायतचे झालेल्या नुकसानीची भरपाई होत नाही तोपर्यंत ट्रेलर हलवू देणार नाही.