मुंबई: रस्त्यावरील भटक्या कुत्री संपूर्ण देशात चिंतेचा विषय आहे. या भटक्या कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केल्याचही अनेकदा समोर आलं आहे. या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी होत असताना एका श्वानप्रेमीने या कुत्र्यांसाठी विशिष्ट आधारकार्ड देऊन त्यांची नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. सायन येथील अभियंता अक्षय रिडलाने ‘pawfriend.in’ या उपक्रमाद्वारे कुत्र्यांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन टॅग असलेलं आधारकार्ड तयार केलं आहे. सध्या हे आधारकार्ड मुंबई विमानतळाबाहेर ((Mumbai Airport)) शनिवारी सकाळी 20 भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात लटकवले असून त्यामध्ये एक QR कोड असतो, जो स्कॅन केल्यावर कुत्र्याची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.
[read_also content=”रुग्णाचे जीव वाचवताना डॅाक्टरनचं गमावला जीव; हृदयविकाराच्या झटक्याने ऑपरेशन थिएटरमध्येच मृत्यू! https://www.navarashtra.com/crime/doctor-died-in-operation-theater-due-to-heart-attack-in-chhattisgarh-nrps-432349.html”]
नेमका प्रकार काय?
मुंबईत मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री आहेत. मुंंबई विमानळ परिसरातही ही भटकी कुत्री फिरताना दिसतात. अनेकदा ही कुत्री कुणी सोडून दिलेली किंवा भटकलेलीही असतात. या कुत्र्यांना वेगळी ओळख मिळावी आणि त्यांची नोंदही राहावी या उद्देशाने अभियंता अक्षय रिडलाने हे त्यांना आधारकार्डने ओळख देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाच्या सुरुवातीला त्याने आणि त्याच्या टिमने 20 भटक्या कुत्र्यांच्या हे अनोखं आधारकार्ड दिलं. या आधारकार्डमध्ये एक QR कोड आहे, जो स्कॅन केल्यावर कुत्र्याच्या माहितीसह फीडरचे संपर्क, तपशील जसे की, त्याच नाव, लसीकरणासंबधी माहिती, नसबंदी आणि वैद्यकीय माहिती आपल्याला मिळते.
TOI नं दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि त्याच्या टीमने मोठ्या अशाप्रकारे सध्या 20 कुत्र्यांना गळ्यात हे आधारकार्ड लटकवलं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल असलेल्या या कुत्र्यांच्या लसीकरणाची जबाबदारी बाहेर BMC ने घेतली आहे.
‘pawfriend.in’ हा उपक्रम सुरू करणाऱ्या अक्षयने सांगितले की, या उपक्रमाद्वारे कुत्र्यांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन टॅग तयार करण्यात आले आहेत. ‘आम्ही सकाळी 8.30 च्या सुमारास सुरुवात केली आणि क्यूआर कोड टॅग निश्चित करण्यासाठी आणि लसीकरण कुत्र्यांना पकडून आणले. एखादे पाळीव प्राणी हरवले असल्यास त्याच्या गळ्यातील आधारकार्डवरील QR कोड टॅग त्याला त्याच्या कुटुंबासोबत भेटण्यात मदत करू शकतो. तसेच यामुळे शहरातील भटक्या प्राण्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखण्यासाठी बीएमसीला मदत होऊ शकते.