शेतात वीज कोसळून 6 महिला जखमी
छत्रपती संभाजीनगर : पाऊस, अवकाळी, गारपीट यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना घडत राहतात. मराठवाड्यात तीन वर्षांत वीज पडून 204 जणांचा मृत्यू झाला आहे तर, वीज पडून ३ हजार २४६ पशूधन दगावले आहेत. पावसाळ्यात वीज पडून सर्वाधिक मृत्यू होतात. नदी नाल्यात पूर आल्याने त्यात वाहून गेल्यानेही मृत्यू ओढवतात. वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.
मराठवाड्यात वीज अंगावर पडून सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. एकीकडे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वीज पडल्याने मनुष्यहानी झाली आहे. तर दुसरीकडे पशुधनाचीही मोठी हानी समोर आली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, वीज अंगावर पडून ३ हजार २४६ जनावरे दगावली आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७०३ पशूधन दगावले आहेत. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात ६३७, बीड ३९३, लातूर ३४६, धाराशिव ३४४, हिंगोली २६५ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन वर्षात वीज पडून १७९ पशूधन दगावल्याची माहिती आहे.
त्यापाठोपाठ लातूर व परभणी जिल्ह्यामंध्ये झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ४३ जणांचे वीज पडून मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात २०२२ मध्ये २५ जणांचा, २०२३ मध्ये ८ तर २०२४ मध्ये १० जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्यात वीज पडून मृत्यू
लातूर जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यात तीन वर्षात प्रत्येकी ३० जणांना तर बीड जिल्ह्यात २९, जालना व छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी २३ तर हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी १२ जणांचे गेल्या तीन वर्षात वीज पडून मृत्यू झाला आहे.