43rd PSPB Inter-Unit Lawn Tennis Tournament organized
पुणे : भारत पेट्रोलियम यांच्यातर्फे 43व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भारतीय ऑलिम्पिकपटू रोहन बोपन्ना, सुमित नागल, अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे यांसह डेव्हिस कूपर युकी भांब्री, विष्णू वर्धन हे अव्वल भारतीय टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी 27 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे.
100 हून अधिक खेळाडूंचा सहभाग
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना भारत पेट्रोलियमच्या क्रीडा विभागाचे सरव्यवस्थापक दीपक जैन यांनी सांगितले की, स्पर्धेत 100 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून, यामध्ये हे खेळाडू आयओसीएल, ओएनजीसी, एमएनजीएल, ओआयएल, एनआरएल, इआयएल, एचपीसीएल आणि आयोजक बीपीसीएल या संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच, ही स्पर्धा पुरुष, महिला आणि प्रौढ गटांत होणार आहे. यावेळी पीएसपीबीचे सल्लागार ललित वत्स आदी मान्यवर उपस्थित होते.
अव्वल टेनिसपटूंचा असणार सहभाग
स्पर्धेत अव्वल भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, दिवीज शरण, सुमित नागल, प्रार्थना ठोंबरे, रिया भाटिया, रश्मी चक्रवर्ती हे खेळाडू इंडियन ऑईल कॉर्पोरेशन संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ओएनजीसी संघात डेव्हिस कूपर युकी भांब्री, विष्णू वर्धन, व्हीएम रणजित यांचा तर, बीपीसीएलमध्ये उदयोन्मुख खेळाडू वैष्णवी आडकर, प्रौढ विजेता खेळाडू राज कुमार दुबे यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रमाणित ऑफिशियल्सचा देखील समावेश
स्पर्धेचे सामने आयटीएफ नियमानुसार खेळविण्यात येणार असून अव्वल भारतीय टेनिसपटूबरोबच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रमाणित ऑफिशियल्सचा देखील समावेश असणार आहे. भारतातील क्रीडापटूंची गुणवत्ता जोपासण्यासाठी भारत पेट्रोलियम आणि अन्य ऑइल कंपन्यांनी दिलेले योगदान तसेच, आंतराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात सातत्याने होत असलेली चमकदार कामगिरी यामध्येसुद्धा ऑइल कंपन्यांचे महत्वाचे योगदान असल्याचे जैन यांनी आवर्जून नमूद केले.
स्पर्धेतील सहभागी संघ खालीलप्रमाणे :
बीपीसीएल – महिला गट – वैष्णवी आडकर; प्रौढ गट – राज कुमार दुबे, पी.व्ही.रवितेज, एन. चंद्रशेखर, मुनेश शर्मा, जोसेफ अँथोनी कुंजूर, थॉमस जेम्स, खुसविंदर, मनीष शर्मा;
आयओसीएल: पुरुष गट: रोहन बोपन्ना, दिवीज शरण, सुमित नागल; महिला गट: प्रार्थना ठोंबरे, रिया भाटिया, रश्मी चक्रवर्ती; प्रौढ गट: पंकज कुमार गंगावर, सुभाष राजोरा, त्रिभुवन कुमार, मनोज पतीर;
एमएनजीएल: पुरुष गट: नीलभ नारायण; ओएनजीसी: पुरुष गट: युकी भांब्री, विष्णू वर्धन, व्हीएम रणजित; प्रौढ गट: एस.के.पी. भंडारी, विजय पी.टी., अमिया सरकार, के.एस.रावत;
ओआयएल: पुरुष गट: उदित गोगई, शेख मोहम्मद इफितिखार, पार्थिव कलिता, रियान कश्यप; प्रौढ गट: दिगंता केआर बोरा, डॉ. सिद्धार्थ देवरी भराली, धृबा ज्योती हजारिका, मोहम्मद हकीम अली;
एनआरएल: पुरुष गट: सुबुल चंद्रा हलोई; सिद्धार्थ प्रतिम दत्ता, राहुल आनंद, रितुराज सैकिया; प्रौढ गट: जयंता कमल, बाभूळ ज्योती दास, कृष्णा कांता दत्ता;
इआयएल: पुरुष गट: एस बालाजी, एस त्रिपाठी, अक्षय कुमार, महेश कुमार; प्रौढ गट: रजनीश मलिक, आर के सिंग, अजय जैन, सौरभ अगरवाल;
एचपीसीएल: पुरुष गट: अरुण सिंग, जेसविन जी, बिष्णोई क्रिशन कुमार, संदीप कुमार; प्रौढ गट: देबाशिष चक्रवर्ती, भूपती मुरली कृष्णा, रशिम चावला, सत्यपाल, भीमनेनी श्रीकांत.
हेही वाचा : PBKS ने 119.65 कोटी खर्च करून तयार केला 25 खेळाडूंचा संघ, मजबूत स्थितीत पंजाब