Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरात सायंकाळपर्यंत 44 टक्के मतदान; वाचा विभागवार मतदानाची टक्केवारी

  • By युवराज भगत
Updated On: May 13, 2024 | 07:13 PM
पुणे शहरात सायंकाळपर्यंत 44 टक्के मतदान; वाचा विभागवार मतदानाची टक्केवारी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ४४ टक्के मतदान झाले असुन, ही टक्केवारी ५० ते ५५ टक्क्यापर्यंत पाेचण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत ४९.८७ टक्के इतके मतदान झाले हाेते. यावेळी ते थाेडे वाढण्याची शक्यता आहे. मतदारांचा काैल आता मतपेटीत बंद झाला असून, आता ४ जूनपर्यंत निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

जायंट किलर ठरलेले आमदार रवींद्र धंगेकर
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सुरुवातीला एकतर्फी वाटत हाेती. गेल्या दाेन लाेकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय मिळविला हाेता. या पार्श्वभूमीवर पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात भाजप (महायुती) सहज विजय मिळवेल अशी चर्चा हाेती. परंतु, महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली.

धंगेकर यांनी माेहाेळ यांच्यासमाेर आव्हान

प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत धंगेकर यांनी माेहाेळ यांच्यासमाेर आव्हान उभे करण्यात यश मिळविले. यामुळे मतदानाविषयी कमालीची उत्सुकता दिसून आली. काेणाचा काेणत्या भागात, काेण काेठे चालले याची चर्चा मतदारांमध्ये दिसून आली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वंसत माेरे हे या लढतीत रंग भरून ही लढत तिरंगी करतील अशी चर्चा केली जात हाेती. परंतु, शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रचारात उडी घेतली. त्यामुळे ही लढत महायुतीचे मुरलीधर माेहाेळ विरुद्ध महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात दिसत आहे.

मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा
गेल्या काही िदवसापासून पुण्याच्या तापमानात वाढ झाली अाहे. दुपारनंतर ढगाळ हवामान निर्माण हाेऊन अवकाळी पाऊस हजेरी लावत अाहे. यापार्श्वभुमीवर नागरीकांनी सकाळीच मतदान केंद्रावर रांगा लावण्यास सुरुवात केली हाेती. दुपारीही काही भागांत भर उन्हातही मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढत गेला. दुपारी तीन पर्यंत पुणे शहरात ३५ टक्के इतके मतदान झाले हाेते. सांयकाळी पाच वाजेपर्यंत ४४ . ९० टक्के इतके मतदान झाले हाेते. सांयकाळ ६ पर्यंत मतदानाची वेळ हाेती. सहापर्यंत मतदान केंद्रात पाेचलेल्या मतदानाची संधी दिली जाणार असल्याने ही टक्केवारी पाच ते दहा टक्क्यांनी वाढू शकते.

काेथरुडमध्ये मतदानाची टक्केवारी अधिक
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या अािण महायुतीच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या काेथरुड विधानसभा मतदारसंघात ४८.९१ टक्के मतदान झाले हाेते. तसेच कसबा ( ५१.०७)  पर्वती ( ४६.८०), पुणे कॅन्टाेन्मेंट ( ४४ ), शिवाजीनगर ( ३८.७३), अािण वडगांव शेरी विधानभा मतदार संघात ४०.५० टक्के इतके मतदान झाले हाेते.
अपवाद वगळता मतदान प्रक्रीया शांततेत 
किरकाेळ प्रकार वगळता पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. महाविकास अाघाडी अािण महायुतीकडून एकमेकांवर बाेगस मतदान केल्याचा अाराेप केला जात अाहे. शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट या भागात एका मतदान केंद्रावर पैसे वाटपावरून अाघाडी अािण महायुती यांच्या कार्यकर्त्यांना वाद झाला. तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अािण महायुतीचे पदाधिकारी हेमंत रासने यांनी फडके हाैद येथे महाविकास अाघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून बुथवर चिन्ह असलेले फलक लावण्यात आल्याने आंदाेलन केले.

Web Title: 44 percent polling till evening in pune city read division wise polling percentage nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2024 | 07:13 PM

Topics:  

  • Pune Lok Sabha constituency
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीचे ठरले! समविचारींसोबत किंवा स्वबळावर लढणार निवडणूक
1

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीचे ठरले! समविचारींसोबत किंवा स्वबळावर लढणार निवडणूक

“शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे, सूर्यावर थुंकण्यासारखं…; ‘त्या’ टीकेवरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक
2

“शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे, सूर्यावर थुंकण्यासारखं…; ‘त्या’ टीकेवरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.