पुणे : कोंढवा भागात ८ वर्षीय मुलीचा विनयभंग करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून आणि अर्धवट नंबर प्लेटवरून शोधून काढला. कसलाही पुरावा नसताना कोंढवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला जेरबंद केले. तत्पूर्वी या घटनेने ८ वर्षीय चिमुकली घाबरली होती.
विनयभंगाचे पाच ते सहा गुन्हे दाखल
नितीन मारुती ननावरे (वय ४५, रा. धनकवडी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून संबंधित दुचाकी ताब्यात केली. त्याच्यावर यापूर्वीचेदेखील विनयभंगाचे पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. बलात्काराच्या एका गुन्ह्यात त्याने दहा वर्षे शिक्षादेखील भोगली असल्याचे समोर आले आहे, असे कोंढवा पोलिसांनी सांगितले.
या पथकाकडून तपासणी
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक निरीक्षक दिनेशकुमार पाटील, अंमलदार सतीश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, सागर भोसले, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे.
आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पीडित मुलगी घडल्या प्रकाराने प्रचंड घाबरली होती. पोलिसांना आरोपीबाबत काहीही माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे पोलिसांसमोर छडा लावण्याचे आव्हान होते. पोलिसांनी तपास सुरू केला आणि परिसरातील सीसीटीव्ही शोध घेण्यास सुरुवात केली.
दुचाकीची नंबर प्लेट तुलटेली
त्यावेळी एक संशयीत दुचाकी आढळून आली. मात्र, त्या दुचाकीची नंबर प्लेट तुलटेली होती. वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांची चार पथके तयार केली. यावेळी अंमलदार शाहिद शेख व लक्ष्मण होळकर यांनी घटनास्थळाच्या परिसरातील शंभर सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपीने गुन्हा करताना वापरलेली दुचाकी आढळून आली. त्या दुचाकीची नंबर तुटलेली होती. त्यामुळे त्यावरील नोंदणी क्रमांक अर्धवट होता.
‘सिरीज’च्या सुमारे १६ दुचाकीची पोलिसांकडून पडताळणी
त्या नंबरचे साह्याने विविध ‘सिरीज’च्या सुमारे १६ दुचाकीची पोलिसांनी पडताळणी केली. त्यात सीसीटीव्हीत कैद झालेल्या आरोपीची चेहरेपट्टीशी मिळती जुळती होती. आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नऱ्हे येथे पोहचले आणि नितीन ननावरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून संबंधित दुचाकीही मिळाली. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता त्यानेच गुन्हा केल्याचे समोर आले.
Web Title: 8 year old girl was molested case kondhwa police tireless efforts succeeded accused by check the 100 cctvs and broken number plate nryb