Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात ‘लेक लाडकी’चा 888 कुटुंबांना लाभ; 44 लाखांचा निधी वितरित, आता DBT तून मिळणार निधी

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 888 कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुलींच्या जन्मानंतर विविध टप्प्यांवर आर्थिक मदत देण्यात येत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच भविष्यासाठी आधार मिळत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2026 | 03:49 PM
अकोल्यात 'लेक लाडकी'चा 888 कुटुंबांना लाभ; 44 लाखांचा निधी वितरित, आता DBT तून मिळणार निधी

अकोल्यात 'लेक लाडकी'चा 888 कुटुंबांना लाभ; 44 लाखांचा निधी वितरित, आता DBT तून मिळणार निधी

Follow Us
Follow Us:

अकोला : मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षण व संगोपनाला आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 888 कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुलींच्या जन्मानंतर विविध टप्प्यांवर आर्थिक मदत देण्यात येत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच भविष्यासाठी आधार मिळत आहे. मुलगी ही कुटुंबावर आर्थिक ओझे नसून तिच्या शिक्षण व विकासाला प्राधान्य देण्याचा संदेशही या योजनेतून दिला जात आहे.

मुलींचा जन्मदर वाढवणे व शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी २०१७ मध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, या योजनेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ती अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून ‘लेक लाडकी’ योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी ४४ लाख ४० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून ८८८ कुटुंबांना लाभ देण्यात आला असून, संपूर्ण निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे.

पात्र कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाकडून मिळालेला निधी १०० टक्के पात्र लाभार्थी कुटुंबांला वाटप करण्यात आला आहे. एकूण ८८८ कुटुंबांनी अर्ज केले होते. सर्वच पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ मिळाला आहे. शासन निर्णयानुसार आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे.

या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ वा तनंतर मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रूपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रूपये, सहावीत ७ हजार रूपये, अकरावीत ८ हजार रुपये तर मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १ लाख १ हजार रुपये पाच हप्त्यात देण्यात येईल.

अशा आहेत अटी व शर्ती…

लेक लाडकी योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर व शिक्षण घेत असताना काही रक्कम व लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशी पाच हप्त्यात मुलीला रक्कम देण्यात येणार आहे.

– राजश्री कौलखेडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, अकोला

Web Title: 888 families in akola benefit from the lek ladki scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.