
Builder youth shot and committed suicide; The incident happened in his own office
धुळे : शहरातील देवपूर भागातील भोई सोसायटीत राहणाऱ्या 130 बटालियन सीआरपीएफच्या जवानाने पुलवामा येथे कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Jawan Committed Suicide) केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांच्या छळामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय कुटुंबियांना व्यक्त केला आहे. त्यामुळे झालेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
योगेश अशोक बिरहाडे (37, रा. आनंद नगर, भोई सोसायटी, धुळे) असे जवानाचे नाव आहे. अत्यंत मनमिळावू स्वभाव म्हणून त्यांची ओळख होती. 25 जानेवारी 2006 रोजी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यांनी छत्तीसगड, मुंबई (तळोजा) त्यानंतर जम्मू काश्मीर, नांदगाव येथे सेवा दिली. पुलवामा येथे कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या त्यांनी आत्महत्या केली.
रजा संपल्यानंतर झाले होते हजर
दरम्यान, नुकतेच ते रजेवर धुळे येथे आलेले होते. रजा संपल्यानंतर 4 मे रोजी ड्युटीवर हजर होण्यासाठी निघाले होते. मात्र, जाताना त्यांची गाडी हुकली. त्यामुळे त्यांना जायला उशीर झाला. या कारणावरून त्यांना अधिकाऱ्यांनी टॉर्चर केले असावे, असा कुटुंबियांना संशय आहे. ड्युटी जॉईन केल्यानंतर काल सकाळी साडेअकरा वाजता योगेश बिरहाडे यांनी घरी व्हिडीओ कॉल केला होता. तेव्हा ते पत्नी रामेश्वरी यांच्यासह मुलगा व एक वर्षाच्या मुलीसोबत बोलत असताना ते तणावात असल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी एक वाजता जवाना योगेश बिरहाडे यांनी ऑन ड्युटी स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब समजताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर त्याच्या घरी नातेवाईकांस मित्र परिवाराने मोठी गर्दी केली.
सेवेचे शिल्लक होते 4 वर्ष
बिरहाडे यांचे सीआरपीएफमध्ये अवघे तीन ते चार वर्षच शिल्लक राहिले होते. जवान योगेश बिरहाडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा, एक वर्षाची मुलगी. भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून, याप्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी, अशी नातेवाईकांची मागणी आहे.