Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेंभुर्णीत वाघाची कातडी आणि हस्तिदंतसह व्यापारी अटकेत; वन्यजीव तस्करी प्रकरण उजेडात

ही कारवाई वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार करण्यात आली असून, या प्रकरणामागे वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 23, 2025 | 08:49 AM
टेंभुर्णीत वाघाची कातडी आणि हस्तिदंतसह व्यापारी अटकेत; वन्यजीव तस्करी प्रकरण उजेडात
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : वाघाची कातडी आणि हस्तिदंत बाळगल्याप्रकरणी टेंभुर्णी येथील एका व्यापाऱ्याला सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेंभुर्णी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शनिवारी (२१ जून) सायंकाळी सहा वाजता अटक केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल विजयकुमार शहा (वय ४५, रा. ढवळेनगर, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो रंगांच्या व्यवसायाशी संबंधित असल्याचे समजते. पोलिसांनी त्याच्याकडून वाघाची कातडी आणि हस्तिदंत जप्त केले आहेत.

ही कारवाई वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार करण्यात आली असून, या प्रकरणामागे वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास सुरु असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Iran-Israel War : खेळ अजून संपलेला नाही! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये घडतायेत मोठ्या घडामोडी

वाघाची कातडी आणि हत्तीचा दात तस्करीसाठी बाळगल्याप्रकरणी टेंभुर्णी येथील व्यापारी अमोल विजयकुमार शहा (वय ४५, रा. ढवळेनगर, टेंभुर्णी) यास सोलापूर नियंत्रण कक्ष व टेंभुर्णी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शनिवारी (२१ जून) अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक वाघ सदृश कातडी आणि हत्तीचा एक दात जप्त करण्यात आला असून, त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये आहे.

सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेंभुर्णी पोलिसांना टेंभुर्णी परिसरात वन्यजीव अवयवांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्या आधारे पोलिस निरीक्षक नारायण पवार व नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक भिंताडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

संशयित अमोल शहा याच्या ढवळेनगर येथील राहत्या घरी छापा टाकण्यात आला. झडती दरम्यान, प्लास्टिकच्या पिशवीत सुकवलेले व कडक झालेले वाघ सदृश प्राण्याचे कातडे व हत्तीचा एक दात सापडला. प्राथमिक तपासात, या अवयवांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

फक्त 50,000 रुपयांच्या डाउन पेमेंटमध्ये हातात येईल Tata Nexon ची चावी, ‘असा’ EMI चा सोपा हिशोब

या प्रकरणात अमोल शहा याला अटक करून माढा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी वन्यजीव तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी,अप्पर अधीक्षक साहेब प्रीतम यावलकर. उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश जगताप, पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले , पोलीस मुख्यालया तील अंमलदार विवेकानंद कडलास्कर, सचिन मळगे, संदीप गोतसुर्वे, गोविंद थोपटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शितल जगताप व वन विभागाचे शुभम धायतडक यांनी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करीत आहेत.

Web Title: A businessman arrested with tiger skin and ivory in tembhurni wildlife smuggling case comes to light

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त
1

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश
2

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही
3

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं
4

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.