मुंबई : गणेश विसर्जनावेळी प्रभादेवी (Prabhadevi) परिसरात शिंदे गट आणि शिवसेना गटात झालेला वाद (Shivsena Vs Shinde) चिघळल्याची चिन्ह दिसत आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या तक्रारीवरुन २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकरे गटातल्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
[read_also content=”नंदुरबारच्या चरणमाळ घाटात बस पलटी होऊन अपघात, 10 प्रवासी गंभीर जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/10-passengers-seriously-injured-after-bus-overturns-in-nandurbars-ghat-nrps-324484.html”]
गणेश विसर्जनावेळी मंच उभारण्यावरुन सुरु झालेल्या वादाला आता वेगळं लागलं आहे. शिंदे गट आणि शिवसेनेमधे राडा झाला आहे. एकीकडे शिवसेनेच्या शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर यांच्यावर यावेळी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे या शिंदे गटातली संतोष तेलावणे यांना शिवसैनिकांडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. या मारहाणी प्रकरणई संतोष तेलवणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरुन २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकरे गटातल्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या शिवसैनिकांकडे चॉपर, तलवार असल्याचंही त्यांनी म्हणटलं आहे.
शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या त्यांचा शिवसेना गटातील काही लोकांसोबत वाद झाला होता. या वादातून शिवसैनिकांकडून संतोष तेलावणे यांना मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, तेलवणे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेलवणे यांच्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जनाच्या दरम्यान प्रभादेवी परिसरात शिंदे गटाने गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावला होता. तर, त्याचवेळी ठाकरे गटानेदेखील स्टॉल लावला होता. दरम्यान दोन्ही गटांंत वाद झाला होता. त्यावेळी हा मिटला ही होता. मात्र, रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर, यशवंत विचले आदींसह 20 ते 25 कार्यकर्ते बांबू, चॉपर, लाठ्या काठ्यांसह आले असल्याचे संतोष तेलवणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.