Maharashtra Monsoon Session 2025: महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. आज (15 जुलै) विधिमंडळात मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि मंत्री शंभुराज देसाऊ यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यतच मंत्री गुलाबराव पाटील शंभुराज देसाईंच्या मदतीला धावले. पण आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाईं दोघांवरही वरचढ झाल्याचे पाहायला मिळाले.
सभागृहात बोलताना, वरूण सरदेसाई यांनी वांद्रे परिसरातील 42 एकर संरक्षण विभागाच्या मालकीची जमीन आणि तेथील 9,483 झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला. या मुद्द्यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी 2019 ते 2022 या काळात तत्कालीन सरकारने यासंदर्भात एकही बैठक घेतली नाही,असे सांगितले. देसाईंच्याउ उत्तराने वरुण सरदेसाई व आदित्य ठाकरे आक्रमक झाले.
वरुण सरदेसाई म्हणाले, “मंत्र्यांनी जे पत्रकात लिहिलं आहे, तेच सभागृहात वाचलं. त्यांना योग्य प्रकारे माहिती दिली गेली नाही, असं स्पष्ट वाटतं.” यावर शंभूराज देसाई संतापले आणि “तुम्हाला उत्तर ऐकायचं आहे की नाही?” असे म्हणत रागारागातच बसल. पण त्याचवेळी मंत्री गुलाबराव पाटील हस्तक्षेप करत म्हणाले, “छातीवर हात मारून लाज काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही जन्मताच शिकले का?” असा सवाल त्यांनी सरदेसाईंना उद्देशून केला.
“2019 ते 2022 या काळात तुम्ही काय केलं? एकदाही पत्र दिलं नाही, पाठपुरावाही केला नाही. त्यावेळी कोणाचं सरकार होतं? 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही चार वेळा पत्रं दिली. मग आमच्यावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कुठून मिळतो?” असा सवाल करत शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली.”मी कोणाचं नाव घेतलं नाही, तरी एवढा संताप का? एवढी नाकाला मिरची का लागली?” असेही ते म्हणाले.
विधानसभा सभागृहाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधताना वरुण सरदेसाई म्हणाले, “वांद्रेतील 42 एकर संरक्षण खात्याच्या जमिनीबाबतचा प्रश्न मी उपस्थित केला होता. गृहनिर्माण विभागाकडून उत्तर अपेक्षित होतं. अर्धा तास लक्षवेधी चालली, पण प्रश्नाचे उत्तर मिळालंच नाही. आम्ही इथे आमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायला येतो. हे विधिमंडळ जनतेच्या प्रश्नांसाठी आहे. पण इथे 2019 आणि 2022 मध्ये काय झालं, हाच खेळ सुरू आहे. हे राजकारण आणि धंदे बंद करा आणि जनतेचे प्रश्न सोडवा,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
तुमचाही पुनर्जन्म झालाय, या संकल्पनेवर काय म्हणतात विविध धर्म? जाणून घ्या
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन हस्तांतरण केली गेली असल्यास, त्यावर आक्षेप का? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला. “हा मुद्दा माझ्या विधानसभा मतदारसंघावरही परिणाम करतो. जर धारावीच्या पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन हस्तांतरित होऊ शकते, तर या प्रकरणात विरोध का? आणि राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, “या प्रकरणी माझ्या कार्यालयात लवकरच बैठक घेण्यात येईल.”
या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. “मंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत, चुकीची माहिती देत आहेत. यावर आपण विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणावा का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.