उत्तुर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उत्तुर (ता.आजरा) येथील रवींद्र यल्लाप्पा कामत (वय ४२) या युवकाने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Kolhapur) केली. याबाबत आजरा पोलिसात कृष्णा गोविंद कांबळे यांनी माहिती दिली.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी, सकाळी दहाच्या सुमारास रवींद्र यांनी आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून घेतला. गळफास लावण्यात आलेली दोरी तुटून पडल्यानंतर रवींद्र यांचा मृतदेह फरशीवर पडला. रवींद्र यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई असा परिवार आहे.

दरम्यान, रवींद्र कामत यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. आजरा पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.