माण नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू
म्हसवड : पळशी येथील युवक नवनाथ पाटोळे हा माण नदीत बांधलेल्या बंधाऱ्यावरून चालत जाताना नदी पात्रात बुडाला. माणचे तहसीलदार सचिन अहिरे व उज्वला गाडेकर, प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या युवकाला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व म्हसवड पालिकेचे कर्मचारी बोटीतून शोध घेत आहेत. मात्र, तीन वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा शोध लागला नसून पुन्हा एकदा जोमाने शोधमोहीम सुरू आहे. पळशी येथून मंगळवारी रात्री हा युवक झाशी येथे जाताना ही घटना घडली आहे.
दरम्यान, माण तालुक्यात झालेल्या पावसाने परिसरातील पाझर तलाव भरले आहेत. तसेच माण नदीत पाणीसाठा झाला आहे. बंधारे भरले असल्याने शेतकरी व युवकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन अहिरे यांनी केले आहे.
नेरळ परिसरात चौघे बुडाले
नेरळ परिसरात असणाऱ्या पाषाणे या धरणावर दिघी, नवी मुंबई येथील चार तरुण मित्र शनिवारी सायंकाळी पर्यटनास आले होते. ते आंघोळीसाठी धरणात उतरले असता अजय विष्णू रावत (वय 28) हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध न लागल्याने खोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या टीमला पोलिसांनी बोलावले व रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अजयचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले.