मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाने (ACB) चौकशीची नोटीस काढल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आता राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांनाही एसीबीकडून चौकशी करण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.
[read_also content=”भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? – अमोल मिटकरी https://www.navarashtra.com/maharashtra/amol-mitkari-criticized-on-prasad-lad-over-his-controversial-statement-nrps-350719.html”]
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांना एसीबी कडून नोटीस मिळाल्यान राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राजन साळवी यांना टार्गेट करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर, एव्हड्या -राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली असा आरोप साळवी यांनी केला आहे. या नोटीस नुसार साळवींना उद्या एसीबी चौकशीला हजर राहण्याचं सांगण्यात आल्याची माहिती आहे.