mumbai -agra accident
धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावर भरधाव वेगात असलेला कंटेनर ब्रेक फेल झाल्याने थेट हॉटेलमध्ये (Container Accident) घुसल्याची माहिती मिळाली आहे. शिरपूर येथील पळसनेरमध्ये मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील पळसनेर येथील मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला. ब्रेक फेल झाले आणि चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये कंटेनरने अनेकांना चिरले. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
बचावकार्य सुरु
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.