Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; गणपती आगमनाला काही तास शिल्लक असताना मूर्तिकार फरार!

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच, मूर्ती घेण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीतल्या भाविकांना मंगळवारी धक्का बसला. मूर्तिकाराचा फोन बंद असून, कारखानाही बंद झाल्याचे त्यांना दिसून आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 26, 2025 | 06:43 PM
Dombivali: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; गणपती आगमनाला काही तास शिल्लक असताना मूर्तिकार फरार!
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली: गणेशोत्सवापूर्वीच डोंबिवलीतील गणेशभक्तांवर मोठं संकट ओढवलं आहे. गणपती आगमनाला काही तास शिल्लक असताना डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवरील ‘आनंदी कलाकेंद्र’ नावाच्या कारखान्यातील मूर्तिकार प्रफुल परशुराम तांबडे अचानक गायब झाल्याने शेकडो भाविकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी मूर्ती बुक केलेल्या भक्तांना आता मूर्ती आणि पैसे दोन्हीही मिळाले नाहीत.

भक्तांची निराशा आणि संताप

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच, मूर्ती घेण्यासाठी गेलेल्या भाविकांना मंगळवारी धक्का बसला. मूर्तिकाराचा फोन बंद असून, कारखानाही बंद झाल्याचे त्यांना दिसून आले. बाप्पाला घरी कसे आणायचे, या चिंतेने शेकडो गणेशभक्त हवालदिल झाले आहेत. त्यांची बुकिंगची रक्कमही वाया गेली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीतील गणेशभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा: Mumbai Traffic: गणेश चतुर्थीला मुंबईकरांनो ‘या’ मार्गावरून प्रवास करणं टाळा! पाहा कोणता मार्ग सुरू, कोणता बंद

‘श्री साई आर्ट्स’ आणि ‘ललिता कला केंद्र’ची मदत

या कठीण परिस्थितीत, डोंबिवलीतील काही मूर्तिकार मदतीसाठी पुढे आले आहेत. ‘श्री साई आर्ट्स’, डोंबिवली यांनी जाहीर केले आहे की, त्यांच्याकडे असलेल्या काही मूर्ती गरजू भक्तांना देण्यास ते तयार आहेत. अधिक माहितीसाठी त्यांनी +९१ ९३२२५१९००४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

त्याचप्रमाणे, ‘ललिता कला केंद्र’नेही प्रभावित झालेल्या भक्तांसाठी विशेष सवलतीच्या दरात गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे:

१.५ फूट मूर्ती: ₹५००

२.० फूट मूर्ती: ₹१,०००

ललिता कला केंद्राचे रिद्धेश सावंत यांनी सांगितले की, ‘आपल्या उत्सवाचा आनंद कायम राहावा हीच आमची इच्छा आहे.’ अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी ठाकुर्ली स्टेशन रोडवरील ललिता कला केंद्राला भेट द्या किंवा रिद्धेश सावंत यांच्याशी ९१३६८२१२८२ या क्रमांकावर संपर्क साधा.

Web Title: Outrageous incident in dombivli sculptor absconds with just a few hours left for ganpatis arrival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • Dombivali Crime
  • dombivali news
  • Ganesh Chaturthi 2025
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar : वंजारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी महिलांचे जलसमाधी आंदोलन
1

Ahilyanagar : वंजारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी महिलांचे जलसमाधी आंदोलन

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल
2

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश
3

मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हा उपाध्यक्षांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश

‘चालतंय’ ही वृत्ती आता नाही; नितीन गडकरींचा अभियंत्यांना कडक इशारा, दर्जेदार कामासाठी ‘प्री-कास्टिंग’चा सल्ला
4

‘चालतंय’ ही वृत्ती आता नाही; नितीन गडकरींचा अभियंत्यांना कडक इशारा, दर्जेदार कामासाठी ‘प्री-कास्टिंग’चा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.