Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी

गुरुवारचा दिवस महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांसाठी काळा ठरला. अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेड येथे झालेल्या तीन भीषण अपघातांत तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. कुठे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला आला, तर कुठे उत्सवासाठी निघालेल्या महिला आणि चिमुकल्यांचा प्रवास ठरला अखेरचा.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 11, 2026 | 01:44 PM
Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी

Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी

Follow Us
Follow Us:
  • तीन जिल्ह्यांत एकाच दिवसात भीषण अपघातांची मालिका
  • कुटुंबीयांसह महिला आणि चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत
  • २१ जणांचा मृत्यू; अनेक जखमी रुग्णालयात दाखल
अहिल्यानगर: गुरुवारचा दिवस महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांसाठी काळा ठरला. अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेड येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांत तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनांमुळे संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे. कुठे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर भंडाऱ्यात तिज उत्सवासाठी माहेरी निघालेल्या महिला आणि चिमुकल्यांचा प्रवास काळाने अर्ध्यावरच थांबवला. नांदेडमध्येही ट्रक आणि पिकअपच्या धडकेत आठ जणांना जीव गमवावा लागला.

अहिल्यानगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील भाळवणी शिवारात हॉटेल संदीपसमोर गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि वॅगनर कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील शकील शेख, सलमा शेख, इकबाल शेख आणि सुमैय्या शेख या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. हे कुटुंब मुंबईतील मालवणी येथील असल्याची माहिती आहे. शकील शेख हे कुटुंबासह अहिल्यानगर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने येत होते. भाळवणी शिवारात त्यांच्या कारला आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. स्थानिक नागरिकांनी जखमींना पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पारनेर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अन्नविषबाधेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

भंडाऱ्यात महिला आणि चिमुकल्यांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर आणि ट्रॅक्स वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत छत्तीसगडमधून नागपूरकडे जाणाऱ्या सहा महिला आणि तीन बालकांचा मृत्यू झाला. सुरुवातीला आठ जणांचा मृत्यू झाला होता. उपचारासाठी नागपूरला नेत असलेल्या आणखी एका महिलेचा वाटेत मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला. मृतांमध्ये ५५ वर्षीय एका महिलेसह बहुतांश महिला ३५ वर्षांच्या आसपासच्या आहेत. तीनही बालके पाच वर्षांखालील आहेत. तिज उत्सवासाठी महिला आपल्या माहेरी नागपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. वाहनांमध्ये १६ ते १७ जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना भंडारा आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. वाहन चालक या अपघातातून बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Pune: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत तीन भागांत मद्यविक्रीवर निर्बंध

नांदेडमध्ये आठ जणांचा मृत्यू

नांदेड-भोकर मार्गावर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. पांडुरंग लिंगू वाघमारे, लक्ष्मीबाई वाघमारे, सय्यद अल्तमेश सय्यद अलीमोद्दीन, शेख फिरोज, बलवान पवार, शाहीद सौदागर आणि कृष्णा पवार अशी मृतांची नावे असून, आणखी एका मृताची ओळख पटणे बाकी आहे. सात जखमींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिन्ही घटनांचा संबंधित पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Accidents involving families with young children from nanded bhandara and ahilyanagar claim 21 lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.