पारनेर तालुक्यातील रस्ते अपघातात बोकनवाडी गावातील तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थ, युवक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात रस्ता रोको आंदोलन केले.
पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कांदा रडवताना दिसत आहे. मात्र, यावेळी व्यापारी देखील शेतकऱ्याला रडवत आहेत. एके ठिकाणी तरी १ किलो कांद्याला फक्त 1 रुपयांचा भाव मिळाला आहे.
जलजीवन मिशन योजनेची कामे सुरु असतानाच अधिकारी कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे सांगत आहे. यावरूनच आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी संत्र्यांची बाग फुलवली, त्यांना आता मोठा आर्थिक लाभ होताना दिसत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे संत्र्याला मिळालेला ७५ रुपयांचा उच्चांकी दर.
मिरजगाव शहरातील सिद्धार्थनगर येथील दिवंगत माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या कुटुंबावर दि.१ जानेवारी रोजी जोरदार हल्ला करण्यात आला. चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सुजित झावरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जांभूळवाडीतील कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच आदिवासी समाजाला वीज मिळावी यासाठी ३७.४३ लाख रुपये मंजूर झाले आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी २८ उमेदवारांनी माघार घेतली. आज या माघारीनंतर निवडणूक रिंगणात ४७७उमेदवार राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यास उद्या शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.
राज्यभरात निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. महानगरपालिका निवडणूक जवळ आली असतानाच अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अनेक वर्षांपासून अहिल्यानगर-मनमाड रोडची दुरावस्था अजूनच वाईट होत चालली आहे. अखेर, हा रोड बांधण्यासाठी एका सामान्य नागरिकाने स्टेट बँकेकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी केली आहे.
आज म्हणजेच दिनांक २७ डिसेंबर 2025 रोजी पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील विकासकामांना आजपासून सुरुवात झाली आहे.