सोलापूर : सैराट सिनेमात लंगड्या हे पात्र साकारुन घराघरात पोहोचलेला अभिनेता तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता तानाजी एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तानाजीला सोलापूरमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिनेता तानाजी गालगुंडेला काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर अमेय ठाकूर सध्या अभिनेता तानाजी गालगुंडेवर उपचार करत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी गालगुंडे याच्यावर काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. उपचार केल्यानंतर तानाजी गालगुंडे लवकर बरा होईल, असे त्यांनी सांगितले.
सैराटशिवाय तानाजी गालगुंडेने ‘गस्त’ आणि ‘भिरकीट’ या चित्रपटांमध्ये देखील प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘झुंड’ या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली आहे. ‘मन झालं बाजिंद’ या मराठी मालिकेत देखील तानाजी गालगुंडेने महत्वाची भूमिका साकारली आहे.