मुंबईत सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या
मुंबई : लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात पार पडली. या निवडणुकांच्या पूर्वी घरगुती गॅस सिलेंडर असो किंवा सीएनजी-पीएनजी यांच्या दरात कोणतीही वाढ केली गेली नाही. मात्र, आता या दोन्ही निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वसामान्यांना जोरदार झटका दिला आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, फक्त मुंबईतच नाही तर देशातील इतर अनेक शहरांमध्येही सीएनजीच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत. मुंबई व्यतिरिक्त, राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये सीएनजी-पीएनजी पुरवठा करणारी कंपनी सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि इतर शहरांमध्येही त्यांच्या किमती वाढवण्यात आल्या.
महाराष्ट्रात सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) च्या वेबसाइटनुसार, निवडणुका संपल्यानंतर, मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किमतीत प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किमती होत्या स्थिर
कच्च्या मालाच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली असली तरी, एमजीएल आणि अदानी टोटल गॅस लिमिटेडसारख्या इतर शहरी गॅस किरकोळ विक्रेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळ किमती स्थिर ठेवल्या होत्या. अहवालानुसार, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका संपताच, एमजीएलने सीएनजीची किंमत प्रति किलो 77 रुपये केली आणि 23 नोव्हेंबरपासून ती लागू करण्यात आली आहे.
नोएडा-गाझियाबादमध्ये आयजीएल वाढला
आयजीएल वेबसाईटनुसार, दिल्लीत सीएनजीची किंमत ७५.०९ रुपये प्रति किलो आहे. तर ताज्या वाढीनंतर, एनसीआरमधील नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये किमती प्रति किलो दोन रुपयांनी वाढल्या आहेत आणि आता ८१.७० रुपये प्रति किलो झाल्या आहेत. तर हरियाणातील गुरुग्राममध्ये एक किलो सीएनजी (गुरुग्राम सीएनजी किंमत) ८२.१२ रुपयांना उपलब्ध असेल.