Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोमॅटो, लसूणनंतर आता कांदा ‘रडवणार’; कांद्याच्या दरात होणार विक्रमी वाढ?, जाणून किती होऊ शकते वाढ…

देशभरात टोमॅटोचे भाव (Tomato Prices) गगनाला भिडले आहेत. कुठे टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे, तर कुठे प्रतिकिलो 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाला असला तरी आता कांद्याच्या दरातही (Onion Prices) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2023 | 07:22 AM
टोमॅटो, लसूणनंतर आता कांदा ‘रडवणार’; कांद्याच्या दरात होणार विक्रमी वाढ?, जाणून किती होऊ शकते वाढ…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशभरात टोमॅटोचे भाव (Tomato Prices) गगनाला भिडले आहेत. कुठे टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे, तर कुठे प्रतिकिलो 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाला असला तरी आता कांद्याच्या दरातही (Onion Prices) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होऊ शकते, असे एका अहवालात म्हटले आहे. सध्या कांद्याचा भाव प्रतिकिलो 28 ते 32 रुपयांपर्यंत आहे.

ऑगस्टअखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यात कमतरता असल्याने पुढील महिन्यात ही वाढ सुमारे 60 ते 70 रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅतनालिटिक्सच्या अहवालानुसार, एवढी किंमत वाढल्यानंतरही या वाढलेल्या किमती 2020 च्या सर्वोच्च पातळीच्या तुलनेत खालीच राहणार आहेत.

रब्बी कांद्याचे शेल्फ लाइफ 1-2 महिन्यांनी कमी झाल्यामुळे आणि यंदा फेब्रुवारी-मार्चमध्येच विक्री झाल्यामुळे खुल्या बाजारात रब्बीच्या कांद्याचा साठा सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारात पुरवठ्याची कमतरता होणार असून, भाव वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये नवीन कांद्याचे पीक आल्यावर भाव पुन्हा खाली येऊ शकतात.

पेरणीत घट

कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कमी कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे या वर्षी क्षेत्रात 8 टक्क्यांनी घट होणार असून, कांद्याचे खरीप उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घटणार आहे. वार्षिक उत्पादन 29 दशलक्ष टन (एमएमटी) अपेक्षित आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्के जास्त आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी उत्पादन कमी असूनही यंदा मोठी तूट येण्याची शक्यता नाही.

Web Title: After the tomato prices the onion prices may increased high nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2023 | 07:22 AM

Topics:  

  • Onion Prices

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.