Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यातील 31 माजी आमदारांना मिळते पेन्शन; दोघांना सर्वाधिक 72 हजार मिळतात तर कुटुंबियांना…

प्रत्यक्ष खर्च मात्र अतिरिक्त कार्यकाळानुसार मिळणाऱ्या वाढीव पेन्शनमुळे यापेक्षा अधिक आहे. माजी आमदारांच्या निवृत्तीवेतनाच्या यादीत मतदारसंघांचे माजी लोकप्रतिनिधी समाविष्ट आहेत. काही माजी आमदारांना ५० हजारांपेक्षा अधिक निवृत्तीवेतन मिळत असल्याची नोंद आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2026 | 03:22 PM
३१ माजी आमदारांना मिळते पेन्शन

३१ माजी आमदारांना मिळते पेन्शन

Follow Us
Follow Us:

अकोला : विधानसभा आणि विधान परिषदेच्या माजी आमदारांना शासनाच्या वतीने पेन्शन दिली जाते. अकोला जिल्ह्यातील ३१ माजी आमदारांना सध्या शासनाकडून निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत आहे. माजी आमदारांना किमान एक कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर दरमहा ५० हजार रुपयांपासून निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद आहे. अतिरिक्त कार्यकाळानुसार, पेन्शनच्या रकमेत वाढ होते. त्यामुळे प्रत्येक माजी आमदाराला मिळणारी रक्कम त्यांच्या कार्यकाळानुसार वेगवेगळी आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील ३१ माजी आमदारांच्या निवृत्तीवेतनावर शासनाचा दरमहा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. किमान ५० हजार रुपये प्रतिमाह या दराने ३१ माजी आमदारांचा विचार केल्यास हा खर्च महिन्याला किमान १ कोटी ५५ लाख रुपये, तर वर्षाला किमान १८ कोटी २० लाख रुपये इतका खर्च होतो. प्रत्यक्ष खर्च मात्र अतिरिक्त कार्यकाळानुसार मिळणाऱ्या वाढीव पेन्शनमुळे यापेक्षा अधिक आहे. माजी आमदारांच्या निवृत्तीवेतनाच्या यादीत मतदारसंघांचे माजी लोकप्रतिनिधी समाविष्ट आहेत. काही माजी आमदारांना ५० हजारांपेक्षा अधिक निवृत्तीवेतन मिळत असल्याची नोंद आहे.

दरम्यान, माजी आमदारांना दिल्या जाणाऱ्या दरमहा ५० हजार रुपयांच्या किमान निवृत्तीवेतनाच्या तरतुदीला २०२६ मध्ये नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणामुळे आमदारांच्या निवृत्तीवेतनाच्या धोरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

10 दिवंगत आमदारांच्या कुटुंबाला पेन्शन

शासकीय नियमानुसार पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस निम्मी पेन्शन दिली जाते. जिल्ह्यात १० पेन्शनधारक माजी आमदार दिवंगत झाले असून, त्यांच्या पत्नीस आजमितीस कौटुंबिक पेन्शन म्हणून अर्धी पेन्शन मिळत आहे.

जिल्ह्यात एकास आमदार अन् खासदारकीची पेन्शन

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी नंतर खासदारकी देखील मिळविली. आजमितीस त्यांना आमदार आणि खासदार अशा दोन्ही पेन्शनचे ते लाभार्थी आहेत. जिल्ह्यात असे ते एकमेव माजी खासदार आहेत.

सर्वाधिक पेन्शन दोघांना

माजी आमदार म्हणून पेन्शन घेणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात ३१ असली तरी त्यामध्ये दोन माजी आमदारांना सर्वाधिक पेन्शनचा लाभ मिळत आहे. यामध्ये अकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर गणगणे तर अकोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अजहर हुसेन यांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी ७२ हजार मासिक पेन्शन अदा करण्यात येते. तर विधान परिषदेमधून तीनदा आमदार राहिलेले माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांना सर्वाधिक ७० हजार पेन्शन आहे.

Pune Politics : नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Web Title: 31 former mlas from akola receive a pension two of them receive the highest amount of 72000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.