
अकोला परिमंडळातील 2 लाख ग्राहकांची थकबाकी माफ; व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ
योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व अन्य बिगरशेती ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक यासाठी पात्र आहेत. मात्र, कृषिपंप ग्राहक आणि सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांना यातून वगळण्यात आले आहे. योजनेंतर्गत थकबाकीवरील १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ केला जाणार आहे. उर्वरित मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे.
दरम्यान, लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम आगाऊ भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरता येईल. उच्चदाब ग्राहकांसाठी ३ ते ६ हप्त्यांचा पर्याय उपलब्ध आहे. २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजजोडणी पुन्हा सुरू करताना प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळेल.
अकोला परिमंडळात २४१ कोटींची मूळ थकबाकी
अकोला परिमंडळातील पात्र ग्राहकांकडे २४१ कोटी ७ लाख रुपयांची मूळ थकबाकी असून, त्यावर ४० कोटी ५५ लाख रुपये व्याज आणि २ कोटी ९५ लाख रुपये विलंब आकार आहे. अकोला जिल्ह्यातील ६९ हजार ४१९ ग्राहकांकडे ७५ कोटी ४० लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. त्यांचे १२ कोटी २९ लाख रुपये व्याज आणि ९३ लाख रुपये विलंब आकार माफ होणार आहे.
विलंब आकार माफ करण्यात येणार
बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३६६ ग्राहकांकडे १०७ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी असून, १९ कोटी ९५ लाख रुपये व्याज आणि १ कोटी २८ लाख रुपये विलंब आकार माफ होईल. वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार ३०७ ग्राहकांकडे ५८ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी असून, ८ कोटी २९ लाख रुपये व्याज आणि ७२ लाख ५२ हजार रुपये विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्जाची सुविधा
योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाइल अॅपद्वारे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पात्र थकबाकीदार ग्राहकांनी मुदतीत अर्ज करून व्याज व विलंब आकाराच्या सवलतीचा लाभ घ्यावा आणि थकबाकीचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
1. ‘अभय योजना २०२६-२७’ कोणासाठी आहे?
कायमस्वरूपी किंवा तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या पात्र उच्चदाब व लघुदाब ग्राहकांसाठी ही योजना आहे.
2. अकोला परिमंडळातील किती ग्राहकांना लाभ मिळणार आहे?
एकूण २ लाख ४१ हजार ९२ थकबाकीदार ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3. योजनेत कोणती सवलत मिळणार आहे?
थकबाकीवरील १०० टक्के व्याज आणि विलंब आकार माफ केला जाणार आहे.