पातूर हा डोंगराळ आणि शेतीप्रधान तालुका असल्याने पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे.
लवकरच पंचनाम्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. सर्वेक्षण केलेल्या कक्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्रे आणि जीपीएस को-ऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला तातडीने सादर करण्यात येणार आहे.
अकोला वर्षापासून नैसर्गिक आपत्ती, अनियमित जिल्ह्यातील शेतकरी मागील काही पाऊस, अतिवृष्टी, पावसातील खंड, पिकांचे नुकसान तसेच बोगस बियाण्यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहेत.
मिशन सुधार मोहिमेतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र, शिधापत्रिकेवर मिळणारे इतर लाभ त्यांना चालूच राहणार आहेत.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचा उद्देश जातीय भेदभाव कमी करून सामाजिक सलोखा आणि समतेला चालना देणे हा आहे. विवाहानंतर आवश्यक कागदपत्रांसह लाभासाठी अर्ज…
पोपटखेड धरण वगळता अन्य जलप्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. आगामी काळात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची आवश्यकता आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्यात आला होता. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिकिलो तीन रुपये दराने तांदूळ आणि दोन रुपये दराने गहू देण्यात…
महाराष्ट्रात कागदी शिधापत्रिकेऐवजी ई-शिधापत्रिका सुविधा सुरू करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यातही तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकांचे १०० टक्के डिजिटलायझेशन पूर्ण झाले
पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या…
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन बांधकामाच्या दर्जाची पाहणी करावी आणि कंत्राटदाराला सूचना देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करून प्यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
अल्पावधीत तांत्रिकदृष्ट्या योग्य नियोजन करून खरिपातील कांदा लागवडीचा प्रयोग प्रत्यक्ष शेतपातळीवर आणण्यात आला आहे. खरिपातील कांदा लागवडीचे तंत्रज्ञान, रोपांची वाढ, लागवडीचे नियोजन आणि उत्पादनक्षमता यांचा या प्रयोगातून अभ्यास केला जाणार…
बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. बालकांची सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पात्र वारसांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रस्ताव तपासले जातात.
दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हाताला व डोक्याला काळ्या फिती बांधून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलनस्थळी सरकारचा प्रतीकात्मक पुतळाही ठेवण्यात आला. संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मृत मतदार वगळता इतर पात्र मतदारांना नमुना क्रमांक ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येणार आहे. पडताळणीअंती पात्र ठरणाऱ्या मतदारांचा अंतिम मतदारयादीत समावेश केला जाणार आहे.
जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटी रेबीज व अॅटी व्हेनम लसींचा सद्यस्थितीत पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
शेतीपिकांच्या नुकसानीपोटी तेल्हारा तालुक्यातील २४० शेतकऱ्यांच्या १६० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसाठी १३ लाख ६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या मासिक सभेदरम्यान व्हिडिओ शूटिंग करण्याच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर या वादाचे पर्यवसान नगर परिषदेसमोरच हाणामारीत झाले. यात शिंदेसेनेचे नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे यांच्यासह दोन्ही गटांतील जण जखमी झाल्याची…
आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास नदी-नाल्यांना प्रवाह येऊन जलसाठ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्यास त्याचे परिणाम पुढील काही महिन्यांत अधिक प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता आहे.