Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोषण आहाराचा एक लाखांपेक्षा अधिक बालकांना लाभ; शाळेतही वाढली विद्यार्थ्यांची उपस्थिती

अकोला जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत असून, सद्यस्थितीत पहिली ते आठवीच्या १ लाख ६१ हजार ९८५ विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळण्यास मदत होत असून, शाळेतील उपस्थितीतही वाढ होत असल्याचे चित्र आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 24, 2026 | 12:52 PM
पोषण आहाराचा एक लाखांपेक्षा अधिक बालकांना लाभ; शाळेतही वाढली विद्यार्थ्यांची उपस्थिती

पोषण आहाराचा एक लाखांपेक्षा अधिक बालकांना लाभ; शाळेतही वाढली विद्यार्थ्यांची उपस्थिती

Follow Us
Follow Us:

अकोला : मुलांना संतुलित व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी राज्यात पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित जेवण दिले जाते. अकोला जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत असून, सद्यस्थितीत पहिली ते आठवीच्या १ लाख ६१ हजार ९८५ विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळण्यास मदत होत असून, शाळेतील उपस्थितीतही वाढ होत असल्याचे चित्र आहे.

मिड-डे मील अर्थात मध्यान्ह भोजन योजना विविध कारणांमुळे चर्चेत असली, तरी विद्यार्थ्यांसाठी ती महत्त्वाची ठरत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत एक वेळचे जेवण उपलब्ध होते. त्यातून विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळतो. तसेच शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासही या योजनेची काही प्रमाणात मदत होत आहे. त्यामुळे रोडावलेल्या शाळांच्या पटसंख्येत वाढ होण्यास हातभार लागत आहे.

दरम्यान, मध्यान्ह भोजन योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत वर्षभर कमी-अधिक बदल होत असतो. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ लाख ६१ हजार ९८५ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार, प्रत्येक विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात आहे. यासोबतच दर महिन्याला जिल्हास्तरावर पोषण आहार नमुन्यांची तपासणी करण्यात येते. या संदर्भातील जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना काय?

शाळांमध्ये वितरित अन्नाची गुणवत्ता तपासणे, नमुने 24 तास ठेवणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या जेवणाची चव आधी शिक्षक, स्वयंपाकी, पालक तपासतील. अन्नधान्य, मसाले आदी एक वर्ष शिल्लक मुदतीचे असावे. हात स्वच्छ धुतल्यावरच अन्न हाताळणे, साबण, स्वच्छ पाणी उपलब्ध असणे बंधनकारक आहे.

जेवणानंतर उलटी, जुलाब, ताप अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे, जिल्हास्तरावर दर महिन्याला नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी, मानक कार्यपद्धतीत शाळा व्यवस्थापन समित्या, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, शिक्षणाधिकारी, आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासन यांच्या जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना विविध प्रकारचा आहार

यामध्ये पहिली ते पाचवीच्या ९७ हजार ४६७, तर सहावी ते आठवीच्या ६४ हजार ५१८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना विविध प्रकारचा आहार देण्यात येतो. त्यामध्ये व्हेजिटेबल पुलाव, मोड आलेल्या मटकीची उसळ व भात, चवळी खिचडी, शेवगा वरण-भात, सोयाबीन वडी पुलाव, मसूर पुलाव, मटर पुलाव, चणा-हरभरा पुलाव आणि मुगडाळ खिचडी आदी पदार्थांचा समावेश आहे. आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे.

Web Title: More than one lakh children benefit from nutritious food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 12:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.