Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव; समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

यश अपयश येत असते, जात असते. विजयी झाल्याबद्दल कोणीही अहंकारात जाऊ नये किंवा अपयश आले म्हणून कोणीही खचून जाऊ नये. आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून पुढील निवडणुकीची तयारी करणार आहोत, असे परिवर्तन पॅनलचे प्रमुख दिनेश बनसोडे यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 29, 2024 | 10:26 AM
परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव; समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव; समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची प्रतिष्ठित समजली जाणारी कर्मचारी पतसंस्था क्र- १ च्या लढतीत अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे स्थापित परिवर्तन विकास पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. विवेक लिंगराजनिर्मित समर्थ विकास पॅनल सर्व उमेदवारासह विजयी झाले आहेत.

रंगभवन चौक परिसरातील रॉजर्स इंग्लिश स्कूल येथे रविवारी मतदान घेण्यात आले. प्रारंभी सकाळच्या सुमारास अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, अनिल जगताप यांनी मतपत्रिकेवरील अस्पष्ट चिन्हावरून मतदान प्रक्रिया रोखून धरली. सत्ताधारी गटाला सहकार विभाग मदत करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तब्बल सव्वा तासाने मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. याच दरम्यान विवेक लिंगराज यांच्या पॅनलला मतदारांकडून साहनभूती मिळण्यास सुरुवात झाली.

परिवर्तन पॅनलकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा प्रचार मतदान केंद्र परिसरात करण्यात आला. येथेचं कलाटणी मिळाली आणि विवेक लिंगराज यांचे पॅनल बहुमताने निवडून आले. दरम्यान, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये वातावरण ढवळून निघाले होते.

विजयी उमेदवार आणि मिळालेली मते

सत्ताधारी समर्थ विकास पॅनलकडून श्रीधर कलशेट्टी (५७५), सुरेश कुंभार (५३६), विशाल घोगरे (५४०), शहाजहान तांबोळी (५४८), विष्णू पाटील (५७१), शत्रुघ्नसिंह माने (५६२), गजानन मारकड (५४१), तजमुल मुतवल्ली (५६५), शिवानंद म्हमाणे (५५८), किरण लालबोंद्रे (५५३), विवेकानंद लिंगराज (६३३), विकास शिंदे (५३४) हे सर्वसाधारण तर महिलांसाठीच्या दोन संचालकांसाठी श्वेतांबरी राऊत (५४२), मृणालिनी शिंदे (५३६), अनुसूचित जातीसाठी चेतन वाघमारे (५७४), विमुक्त जातीसाठी शिवाजी राठोड (६२५), तर इतर मागाससाठी विजयसिंह घेरडे (५७२) मते घेऊन विजयी झाले.

समर्थ विकास पॅनलच्या उमेदवारांना ५३४ ते ६३३ मते

सत्ताधारी समर्थ विकास पॅनलच्या उमेदवारांना ५३४ ते ६३३ तर विरोधी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना १६६ ते ३०५ मते मिळाली. विरोधी परिवर्तन विकास पॅनलचे प्रमुख अविनाश गोडसे यांना ३०५ तर विद्यमान चेअरमन विवेक लिंगराज यांना सर्वाधिक ६३३ मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांनी सांगितले.

अनेक जण स्वार्थासाठी एकत्र आले

पतसंस्था क्रमांक एक च्या या निवडणुकीत सभासदांनी एकतर्फी समर्थ पॅनलवर भरघोस विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अनेक जण स्वार्थासाठी एकत्र आले. परंतु पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी ही निवडणूक पतसंस्थेचे अस्तित्वासाठी मनावर घेतली होती. त्यामुळे समर्थ पॅनल निवडणूक लढवली असले तरी सभासदांनी निवडणूक हातात घेतली होती व त्यांनी वर्तन तपासले व समर्थ नैतिक अधिष्ठान आहे. अशांच्या हातात नेहमीच सत्ता आणि विश्वास प्रदान केला आहे.

  • विवेक लिंगराज, समर्थ विकास पॅनल प्रमुख
विजयी झाल्याबद्दल कोणीही अहंकारात जाऊ नये

यश अपयश येत असते, जात असते. विजयी झाल्याबद्दल कोणीही अहंकारात जाऊ नये किंवा अपयश आले म्हणून कोणीही खचून जाऊ नये. आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून पुढील निवडणुकीची तयारी करणार आहे .

  • दिनेश बनसोडे, परिवर्तन पॅनल प्रमुख

Web Title: All candidates of samarth panel are won in solapur zilla parishad patsanstha election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 10:19 AM

Topics:  

  • Solapur Election
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर
1

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव
2

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

सोलापुरात सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी; कुणाला किती जागा मिळाल्या?
3

सोलापुरात सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी; कुणाला किती जागा मिळाल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.