Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुपोषणमुक्त साताऱ्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार; कुपोषित बालकांसाठी 15 लाखांची तरतूद !

‘कुपोषणमुक्त सातारा’ या नाविन्यपूर्ण अभियानासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून २९ ऑक्टोबरला झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीमध्ये कुपोषित बालकांसाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2026 | 01:33 PM
Deaths due to malnutrition have become a serious problem in Melghat maharashtra

Deaths due to malnutrition have become a serious problem in Melghat maharashtra

Follow Us
Follow Us:
  • बालकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पावले.
  • कुपोषणाच्या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी ‘कुपोषणमुक्त सातारा’ अभियान राबविण्याचा पुढाकार.
  • पूरक पोषण आहार अधिक सकस, पौष्टिक आणि आरोग्यपूरक करण्यासाठी आहारातील घटकांमध्ये बदल.
सातारा : बालकांचे आरोग्य सुदृढ करण्यासह कुपोषणाच्या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. पूरक पोषण आहार अधिक सकस, पौष्टिक व आरोग्यपूरक करण्यासाठी आहारातील घटकांमध्ये आवश्यक बदल करण्याचा पुढाकार घेण्यात आला असून, ‘कुपोषणमुक्त सातारा’ या नाविन्यपूर्ण अभियानासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून २९ ऑक्टोबरला झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीमध्ये कुपोषित बालकांसाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

तसेच १२ मे २०२६ रोजी झालेल्या महिला व बालकल्याण विषय समितीच्या बैठकीमध्ये समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे यांनी पूरक पोषण आहारातील (HCM) पांढऱ्या वाटाण्याऐवजी चणा (हरभरा) देण्याबाबत सूचना केली होती. याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक विचार करून आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची विनंती आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुंबई यांना करण्यात आली आहे. त्यानुसार, जिल्हा परिषदेमार्फत १४ जुलै रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी ३१ जुलै २०२६ रोजी पांढऱ्या वाटाण्याऐवजी हिरवा वाटाणा, चणा किंवा चवळी देण्यास मान्यता दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ‘बाळाचे पहिले १००० दिवस’ या संकल्पनेअंतर्गत बालकांच्या आरोग्य आणि पोषणाला विशेष प्राधान्य दिले जात असून सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण (Screening) करण्यात येत आहे.

या माध्यमातून कुपोषित बालकांची ओळख करून त्यांना कुपोषणाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी कुपोषणमुक्त सातारा अभियान सातारा जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणार आहे. सातारा जिल्हा परिषदेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यांना प्राधान्य दिले जात आहे. पोषण आहारातील गुणवत्तावाढ, कुपोषित बालकांसाठी विशेष आर्थिक तरतूद आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून राबविण्यात येणारे सर्वेक्षण या उपक्रमांमुळे कुपोषणमुक्त साताऱ्याच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल अधिक गतिमान होणार आहे.

कुपोषण ही केवळ आरोग्याची समस्या नसून…

“प्रत्येक बालकाला सकस आहार, उत्तम आरोग्य आणि निरोगी बालपण मिळणे हा आमचा संकल्प आहे. कुपोषण ही केवळ आरोग्याची समस्या नसून आपल्या पुढील पिढीच्या भविष्याशी निगडित बाब आहे. त्यामुळे बालकांना दिला जाणारा पोषण आहार अधिक पौष्टिक आणि आरोग्यपूरक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पांढऱ्या वाटाण्याऐवजी हिरवा वाटाणा, चणा व चवळीचा पर्याय उपलब्ध करून घेण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याबाबतही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे”.

निरोगी बालक हीच समृद्ध साताऱ्याची खरी ओळख

‘कुपोषणमुक्त सातारा’ अभियानासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करून कुपोषित बालकांना विशेष पोषण सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा, अंगणवाडी सेविका आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक बालक सुदृढ व निरोगी व्हावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कारण निरोगी बालक हीच समृद्ध साताऱ्याची खरी ओळख आहे.”

– ऋतुजा शिंदे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, सातारा

FAQ

1. ‘कुपोषणमुक्त सातारा’ अभियानाचा उद्देश काय आहे?
सातारा जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारून कुपोषणाच्या समस्येवर प्रभावीपणे मात करणे हा अभियानाचा उद्देश आहे.

2. कुपोषित बालकांसाठी किती निधीची तरतूद करण्यात येणार आहे?
जिल्हा परिषद सेस फंडातून १५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3. पूरक पोषण आहारात कोणता बदल करण्यात येणार आहे?
पूरक पोषण आहार अधिक सकस, पौष्टिक आणि आरोग्यपूरक करण्यासाठी त्यातील आहार घटकांमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.

Web Title: Allocation of 15 lakhs for malnourished children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 01:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.