एकीकडे हिंदी मराठी भाषेचा वाद काही मिटना मिटेना त दुसरीकडे मराठी माणसाचे आणि महाराष्ट्रातले उद्योग परप्रांतीय त्यांच्या राज्यात घेऊन जात असल्याचा गौप्यस्फोट अंबरनाथमधील उद्योग संघटेने केला आहे. मराठी माणसाला व्यापार करायला संधीच मिळत नाही किंवा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जात असल्याची ओरड कायम होत असते. मराठी हिंदीचा हा वाद फक्त शैक्षणिक अभ्यासक्रमातील भाषेचाच नव्हे तर उद्योग जगतातही होत असल्याचा वादाला आता पुन्हा नव्याने तोंड फुटलं आहे.
अंबरनाथ येथे उद्योग संघटनेची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत एमआयडीसीमध्ये दलालांचा सुळसुळाट होत असल्याचा आमा संघटनेने आरोप केला आहे. या आरोपांनंतर आता राज्यभरातील व्यापार क्षेत्रात खळबळ माजली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट झाला आहे, असा गौप्यस्फोट अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे उमेश तायडे यांनी केला आहे. जमिनीचे प्लॉट 4ते 5 पट दराने विकले जात असून उद्योजकांना स्थानिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. असा धक्कादायक आरोप अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या पदाधिकऱ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर एमआयडीसी प्रशासन जमीन अधिग्रहण करण्यापूर्वीच थेट उद्योजकांना त्या जमीनींची विक्री करते. त्यामुळे ज्यावेळेस उद्योजक कंपनी उभारण्यासाठी येतात त्यावेळी मात्र जमीन मालक आणि उद्योजकांमध्ये मोठा वाद निर्माण होतो. परिणामी कंपनी उभारण्यात तीन ते चार वर्षे उलटतात.
या सर्व प्रकाराला एमआयडीसी प्रशासन जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केलाय. हे जर असंच सुरू राहिलं तर अंबरनाथ एमआयडीसीतील जवळपास 1400 कंपन्या परराज्यात स्थलांतरित होण्यास वेळ लागणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया उमेश तायडे यांनी व्यक्त केली.यावेळी पत्रकार परिषदेत आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे, सचिव परेश शहा, खजिनदार लिकार सिंग, जनसंपर्क अधिकारी विजय नायर, सदस्य, राजेश मिर्घ, संदीप तोंडपूरकर, मंगेश सावंत उपस्थित होते.
स्थानिकांच्या जमिनी आणि अद्योजकांच्या कंपन्या यांच्यात योग्यरित्या व्यवहार होत नसल्याने अनेक उद्योजक भूखंड खरेदीतील दलालांच्या कटकारस्थानाला बळी पडले. .याचा झालेला परिणाम म्हणजे उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुसकान सहनं करावं लागल्याने अनेक चांगल्या गुंतवणूकीसाठी आलेल्या कंपन्या या परराज्यात जात आहेत. या सगळ्या दलालांचं कटकारस्थान असंच सुरु राहिलं तर महाराष्ट्रातून चांगला उद्योगाला स्त्रोत निघून जाईल अशी खंत देखील या पत्रकार परिषदेत आमा संघटनेने केली आहे.