Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई शहराचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प कधी पूर्ण होणार? अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ या कार्यक्रमात अमित साटम यांनी मुंबईतील विकास कामाचा आढावा दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 11, 2025 | 02:36 PM
मुंबई शहराचा होणार कायापालट! वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प कधी पूर्ण होणार? अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: नवभारत वृत्त समूहाच्यावतीने नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ चे (Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025) मुंबईतल्या विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई शहराचा कायापालट कशाप्रकारे होणार यासंदर्भातील माहिती दिली.

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर विकास कामांना चालना मिळाली. वर्ष 2005 ते वर्ष 2010 मध्ये कोस्टल रोडची संकल्पना ठेवण़्यात आली होती. तर 1999 ते 2014 या वर्षात वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर एकच मेट्रो धावत होती. मात्र नरेंद्र मोदींच्या काळात म्हणजेच 2014 ते 2025 पर्यंत 356 किलोमीटर मेट्रोची कामे सुरु आहेत. मुंबईचा विकास आत्तापर्यंत दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरातील अंधेरीसारखा भाग व त्यानंतर मागील काही वर्षांत ठाणे, नवी मुंबई असा केंद्रित राहिला आहे. आता विकासाचा ओघ महामुंबई क्षेत्रातील नव्या विकास केंद्रांपर्यंत नेण्यात येणार आहे,अशी माहिती नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.

‘मुंबई वन’ अ‍ॅपमध्ये सागरी वाहतूकीचाही समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘मुंबई वन’ अ‍ॅप लाँच केले. या अ‍ॅपमुळे मुंबईत प्रवास करणे खूप सोपे होईल. आता तुम्ही एकाच अ‍ॅपवरून मेट्रो, मोनोरेल, लोकल ट्रेन, बस आणि टॅक्सीची तिकिटे खरेदी करू शकाल. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) प्रवास करणे पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर होईल.

हे अ‍ॅप कार्यान्वित झाले असून प्रवासी अ‍ॅप डाउनलोड करू शकतात आणि एकच डायनॅमिक क्यूआर कोड तयार करू शकतात. हा क्यूआर कोड तुमचा संपूर्ण मल्टी-मॉडल प्रवास कव्हर करेल. याचा अर्थ असा की तुम्ही मेट्रो, मोनोरेल, लोकल ट्रेन आणि बसने प्रवास करत असलात तरी एकच तिकीट पुरेसे असेल. हे अ‍ॅप ११ वेगवेगळ्या वाहतूक अधिकाऱ्यांसाठी काम करेल. त्याचबरोबर या अ‍ॅपमध्ये सागरी वाहतूकीचाही समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिली.

वांद्रे वर्सेवा सी लिंक कधी पूर्ण होणार?

मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून अरबी समुद्रात वांद्रे वर्सोवा सागरी सेतू उभारला जात आहे. या 17 किलोमीटर लांब सागरी सेतूच्या उभारणीचे काम 2018 पासून हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार सागरी मार्गावर एकूण ८ मार्गिका बांधल्या जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किमी लांबीचा असून, तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये उभारला जाणार आहे. हा वांद्रे वर्सेवा सी लिंक येत्या तीन वर्षात पूर्ण होणार आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिली.

Web Title: Ameet satam statement on mumbai versova bandra sea link bridge in navabharat infrastructure and real estate conclave 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Mumbai
  • real estate

संबंधित बातम्या

Mumbai Terror Attack: ‘दाऊदचा उजवा हात, पाकिस्तानचा पाहुणा…’, २६/११ चा गूढ माणूस, पाकिस्तान १७ वर्षांपासून देते आसरा…
1

Mumbai Terror Attack: ‘दाऊदचा उजवा हात, पाकिस्तानचा पाहुणा…’, २६/११ चा गूढ माणूस, पाकिस्तान १७ वर्षांपासून देते आसरा…

मुंबई विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात १,०३६ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स ची नोंद; प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ!
2

मुंबई विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात १,०३६ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स ची नोंद; प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ!

Dombivali Crime: पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये सापडला तरुणीचा सडलेला मृतदेह; अत्याचार करून हत्येचा संशय
3

Dombivali Crime: पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये सापडला तरुणीचा सडलेला मृतदेह; अत्याचार करून हत्येचा संशय

BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले
4

BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.