अमरावती : जिल्ह्यात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत 15 तरुणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून परतणाऱ्या एका गटाने रस्त्यावर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.
[read_also content=”दिल्ली हादरली – मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सापडलं दोन महिन्याच्या मुलीचं प्रेत, आई आणि भाऊ बेशुद्ध https://www.navarashtra.com/crime/two-months-baby-found-in-microwave-oven-nrsr-258199.html”]
शहरातीव लाल पूल परिसरात ही घटना घडली आहे. अचलपूर येथील एका सिनेमागृहातून चित्रपट पाहून परतणाऱ्या तरुणांच्या एका गटाने लाल पुलाजवळ येऊन जय श्री रामचे नारे लगावले. यावेळी त्याच परिसरातील आझाद नगरमध्ये राहणाऱ्या तरुणांच्या आणखी एका गटाने याचा विरोध केला. यावरून या दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला आणि नंतर या दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. या मारामारीत अनेक तरुण जखमी झाले आहेत.