Accident
अमरावतीत भीषण अपघात झाला असून दोन कारची समोर समोर धडक बसली. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीच्या दर्यापूर-अकोला मार्गावर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आनंद बाहकर (२६ . सांग्लुडकर नगर), बंटी बिजवे (३८ . गजानन मंदिर साईनगर), प्रतीक (३५ . सांग्लुडकर नगर) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कार मधील पप्पू घाणीवाले जखमी आहे. तर दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल हे दोघे जण जखमी झाले आहेत.
अपघाताविषयी बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक
प्राथमिक माहितीनुसार, प्रतीक, आनंद, बंटी आणि पप्पू हे चौघे कारने अकोल्याला जात होते. तर विरुद्ध दिशेने आकाश आणि रमेश अकोल्यावरून दर्यापूरकडे जात होते. तरम्यान दोन्ही कार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर -अकोला मार्गावर गोळेगाव लातूरनजीक आल्यानंतर अचानक कार वरचं नियंत्रण सुटलं आणि दोन्ही कारची एकमेकांना धडक बसली.
आज दुपारी ३ च्या दरम्यान ही घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं आहे. तर तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. तीन जण गंभीर जमखी असून त्यांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी येवडा पोलीस पोहोचले असून अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. दमरम्यान रुग्णालयाबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.
अपघातानंतर दर्यापूर-अकोला मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. एका जखमीवर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल या पितापुत्रांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वरूड-अमरावती रोडवरील लखारा चौकाजवळ बुधवारी रात्री ट्रक आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक बसली होती. यात ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. राजेश रमेश युवनाते (20 पंढरगटी), तौफिक शाह फारूक शाह (32), (रायपूरा, अचलपूर) आणि शेख नजीम शेख सबीर (40), बिलासपूर, अचलपूर यांचा मृत्यू झाला आहे. तर मोहम्मद नासिर मोहम्मद सबीर (45), मोहम्मद निसार मोहम्मद मतीन (38), मोहम्मद कयसर मोहम्मद मतीन (45), सर्व अचलपूर येथील रहिवासी, यांना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. त्याचप्रमाणे मोहम्मद आबिद (49), मोहम्मद मुजाहिद (25), अब्दुल मोहम्मद अरशद (28), सर्व अचलपूर येथील रहिवासी, आणि अन्य जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.