मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे त्या अनेकदा ट्रोलही झाल्या आणि अनेकदा त्यांचे कौतुकही करण्यात आले. पुरणपोळीबद्दल केलेल्या त्यांच्या वक्तव्याची खूपच चर्चा झाली होती. त्यानंतरही फडणवीसांना अनेक कार्यक्रमांमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. पण यावेळी अमृता फडणवीसांनी असेच एक वक्तव्य केले आहे. पण याच माध्यमातून त्यंनी खंतही व्यक्त केली आहे.
“धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण ऐकली की माझ्या डोळ्यांसमोर देवेंद्र फडणवीस येतात. कारण ते समोर असले तरी त्यांच्यासोबत वेळ घालवता येत नाही, मस्ती करता येत नाही, अशी खंत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. सन मराठी वाहिनीवरील ‘होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा’ या शोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अमृता फडणवीसांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृता फडणवीसांनी बेधडक उत्तरे दिली आहेत.
हेही वाचा: शिंदे गट, अजित पवारांचा सुपडा साफ होणार? भाजपचा अंतर्गत सर्वेबाबत रोहित पवारांचा गौप्यस्फोट
“धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हटल्यावर देवेंद्रजी माझ्या डोळ्यासमोर येतात. ते येतात जातात, दररोज दिसतात. पण त्यांना असं पकडून त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे, मस्ती करायची आहे, पण असं काहीही करता येत नाही. त्यामुळेच धरण उशाला असतं, कोरड घशाला काय असते हे देवेंद्रजींकडे पाहून कळते. असे सांगत अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
सोनाली कुलकर्णीने पुन्हा विचारलं, देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? या प्रश्नावर बोलताना अमृता फडणवीसांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. त्यावर सोनालीने ‘आधी होते का?’ असा प्रश्न विचारला असता, ‘कधीच नव्हते’ अस उत्तर त्यांनी दिले. त्यावर, लग्नाच्या आधी पण नव्हते आणि नंतर पण नाही?’ असा प्रश्न सोनालीने खोदून विचारला. तर “देवेंद्र फडणवीस खूप प्रॅक्टिकल आहेत आणि मी रोमँटिक आहे. त्यांना रोमान्स जमतही नाही आणि कळतही नाही. त्यांना आता राजकारण सोडून दुसरे काही कळत नाही, असं अमृता फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा: कौटुंबिक समस्या आत्महत्याचे सर्वात मोठे कारण; धक्कादायक आकडेवारी आली समोर