anjali damania press Allegations that walmik Karad will join BJP party political news
बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या मागील अनेक दिवसांपासून आक्रमक पद्धतीने आरोप करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्या एक्शन मोडमध्ये आल्या. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि अजित पवार गटाचे बीडचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामधील संबंधांबाबत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे व आरोप केले आहेत. तसेच धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर आता त्यांनी राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. त्याचबरोबर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये व्हीआयपी सेवा देण्यात येत असल्याचे देखील दमानिया यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, “२८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते, परंतु वाल्मिक कराडची मालमत्ता अजूनही जप्त करण्यात आलेली नाही. त्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरु आहे. तसेच वाल्मिक कराडला मकोकामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असली तरी अद्याप कृष्णा आंधळे हा फरार आहे. यावरुन टीका करत अंजली दमानिया म्हणाल्या की, “संतोष देशमुख प्रकरणी अजूनही फरार कृष्णा आंधळेला अटक झालेली नाही. त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले नाहीत. जेव्हा मी त्यांच्या अनेक प्रकरणाच्या माहिती घेत होते, तेव्हा माझ्या कानावर असा आला होता कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहे. प्रत्येक जेलमध्ये सुद्धा पैशाची मागणी केली जात आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आयपीएस जालिंदर सुपेकर यांचे नाव पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पुढे येत आहे. यानंतर आता बीडच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सोबत देखील त्यांचे संबंध असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, “आज सुरेश काही असा आरोप केला आहे की 300 कोटीच्या मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती. आता त्याच्यापुढे पण अनेक खुलासे होतील. हेच नाही तर गण लायसन्स प्रकरणात पण सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत. त्याची सुद्धा चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे,” असे आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहेत.